Marathwada Graduate Constituency : मराठवाड्यात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने

Marathwada graduate constituency. ncp_ap verses ncp_sp

Marathwada Graduate Constituency Election News: औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीत महायुतीचे पारडे जड असताना महाविकास आघाडीतील दोन पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यातच खरी लढत होण्याची शक्यता आहे. निवडणूक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून मतमोजणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी Woodstrem Decar LLP, एम.आय.डी.सी. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

Aurangabad Graduate Constituency Election 2026 : औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत एकूण ५४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी एकूण १३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी एकूण ४१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे डॉ.प्रतापसिंह पाटील व शिवसेना (उबाठा) पक्षाचे दिलीप घुगे यांचा समावेश आहे. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मिळाला तर महाविकास आघाडीकडून शिवसेना(उबाठा) गटाला संधी मिळाली. परंतु तरीही महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. महाविकास आघाडीतील दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मुळातच पारडे जड असलेल्या महायुतीचा विजय आणखी सोपा होण्याची शक्यता आहे.

Marathwada Graduate Election News: खरी लढत चव्हाण व पाटील यांच्यातच ?

२००२, २०१४ व २०२० अशी सलग तीन वेळेस विजय मिळवून हट्ट्रिक मिळवलेले सतीश चव्हाण यांच्या सोबत महायुतीची ताकद आहे. तर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने डॉ. वेदप्रकाश पाटील हे रिंगणात आहेत. तसेच शिवसेना(उबाठा) पक्षाचे दिलीप घुगे हे सुध्दा निवडणुक लढवत आहेत. परंतु पदवीधर मतदारसंघामध्ये शैक्षणिक संस्थांचे विशेष महत्व आहे. मतदार नोंदणी, प्रचार यंत्रणा प्रभावीपणे होण्यासाठी शैक्षणिक संस्थामधील मनुष्यबळ अतिशय महत्वाचा घटक आहे. या माध्यमातून जिंकण्यासाठी आवश्यक मतांची पायाभरणी होते व तसेच इतर मतदारापर्यंत पोहोचणे शक्य होते. याबाबत डॉ.प्रतापसिंह पाटील हे सतीश चव्हाण यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या नेत्यांचे मराठवाड्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. राजेश टोपे, फौजिया खान यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांच्याही मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत.

हे वाचा : Anti SIR protest : SIR तो बहाना है…

कोण आहेत डॉ. प्रतापसिंह पाटील ?

Untitled design – 1

डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे उद्योजक, राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक म्हणून परिचित आहेत. श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ, कळंब; श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ, बीड आणि राजलक्ष्मी फाउंडेशन, महाराष्ट्र या संस्थांचे ते संस्थापक सचिव आहेत. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये त्यांच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अशा विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रम शिकवले जातात. माजी कुलगुरू डॉ.वेदप्रकाश पाटील यांचे ते सुपुत्र असून परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांचे ते बंधू आहेत.

हे वाचा : BRICS New Delhi Summit : नाम ते ब्रिक्स ; भारताच्या परराष्ट्र धोरणाचा चढता आलेख

Marathwada MLC Election 2026 : सतीश चव्हाण चौथ्यांदा रिंगणात

पदवीधर मतदार संघाची निवडणूक म्हणजे शैक्षणिक संस्था हेच शक्तीकेंद्र असते असे समीकरण झाले आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सतीश चव्हाण हे कामकाज पाहत आहेत. त्यामुळे पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यामध्ये सतीश चव्हाण हे कायमच अग्रेसर राहिले आहेत.

२००२ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे श्रीकांत जोशी यांनी विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसच्या स्व.वसंतराव काळे यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या सलग तीन निवडणुकीत २०२० च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५७८९५ मतांनी पराभूत करत विजयाची हट्ट्रिक नोंदवली होती.

Marathwada Graduate Voter List : मागील निवडणुकीतील ४७ हजार मतदारांनी फिरवली पाठ

पदवीधरांसाठी मतदारसंघ असल्याने मतदारात जागरुकता असणे अपेक्षित आहे. तसेच सहा वर्षात मोठ्या प्रमाणावर पदवीधर संख्या वाढत असल्याने, मतदारसंख्या वाढणेही नैसर्गिक आहे. मात्र २०२० च्या तुलनेत पदवीधर मतदारांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. २०२० च्या निवडणुकीत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात एकूण ३ लाख ७४ हजार ४५ मतदार होते. जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रांची संख्या कंसात दर्शविली आहे. १) छत्रपती संभाजीनगर -१०६३७९, २) जालना- २९७६५, ३) परभणी – ३२६८१, ४) हिंगोली – १६७६४, ५) नांदेड – ४९२८५, ६) बीड- ६४३४९, ७) लातूर – ४११९०, ८) धाराशिव – ३३६३२.

२०२६ च्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी केलेल्या पदवीधर मतदारांची संख्या ३ लाख २६ हजार ७०१ एवढी आहे. म्हणजेच २०२० च्या तुलनेत एकूण ४७ हजार ३८४ मतदारांनी नोदणीकडे पाठ फिरवली आहे.

यांनी घेतली माघार

अंकुश रामराव शिंदे , ॲड. गुल्लापेल्ली योगेश दत्तु, दीपिका बाप्पा उदरभरे, प्रतीक्षा प्रशांत चव्हाण, प्रशांत रमेश पाटील अवसरमल, प्रियंका केशव तांदळे, बाबासाहेब भुजंगराव उगले, मधुकर किसनराव देशमुख, श्यामकुमार सुरेशराव बोडखे, शेख मोहम्मद अख्तर मोहम्मद सादेक, शेख सलीम शेख इब्राहीम, सुदामराव सदाशिवे आणि संदीप देविदास जाधव 

Marathwada Graduate Election Candidates : अंतिम उमेदवार यादी


Related Posts

Chhatrapati Shivaji Maharaj Mavla : शिवबांचा मावळा

Chhatrapati Shivaji Maharaj Mavla : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्ष…

ऑक्टोबर 16, 2026

Abhijeet dipke Interview: टॅलेंट असं काही नसतं ?

Abhijeet dipke Interview : देशातील विरोधी पक्षांचा लाडका असलेला अभिजीत…

ऑक्टोबर 14, 2026

Anti CEC Protest : SIR तो बहाना है…

CEC Protest : मागील काही दिवसापासून निवडणूक आयोगा विरोधात आरोप…

ऑक्टोबर 7, 2026

Semiconductor Chip Manufacturing : भारतात Semiconductor Chip निर्मितीला सुरुवात; जाणून घ्या भारताला होणारे 7 मोठे फायदे

Semiconductor Chip Manufacturing : भारतामध्ये Semiconductor Chip उत्पादनाला सुरुवात झाली…

सप्टेंबर 19, 2026

Maharashtra Govt GR : निर्णय होतात; पण अंमलबजावणीचाच खरा प्रश्न!

Maharashtra Govt GR : महाराष्ट्र शासनाने शासकीय फाईल सात दिवसांत…

सप्टेंबर 17, 2026

Maratha Reservation: या माणसाने मराठा समाजासाठी काहीच केले नाही का ?

Maratha reservation and Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

ऑगस्ट 30, 2026

Rohit Pawar : रोहित पवारांचा सेल्फगोल

Rohit Pawar News सत्ताधारी पक्षाच्या धोरणाविरुद्ध विरोधकांनी जनतेत जागृती केलीच…

ऑगस्ट 4, 2025

सामनाचे संपादकीय लोकसत्तामध्ये ?

आणीबाणीच्या निषेधार्थ रामनाथ गोयंका यांच्या नेतृत्वाखाली इंडियन एक्स्प्रेस या आघाडीच्या…

जुलै 7, 2025

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत