शैक्षणिक

  • Online Education : ऑनलाईन शिक्षणाची इष्टापत्ती

    Online Education: अस म्हणतात की काळ कोणासाठी थांबत नाही, परंतु या पिढीने काल थांबलेला पाहिला. कधी कोणी कल्पनाही केली नसेल एवढी हादरवून टाकणारी स्तब्धता, भयाण काळरात्रीची शांतता मागील वर्षभरात अनुभवली. कोरोना या शब्दाने प्रचंड दहशत निर्माण केली. जी अजूनही पूर्णत: संपली नाही. या कालावधीत अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ झाली. आर्थिक घडी विस्कटली. शैक्षणिक वर्षाची परवड झाली. जिथे जीवनमरणाचाच प्रश्न असतो तिथे इतर बाबी दुय्यम ठरतात. परंतु या वादळातही जगण्याच्या विजीगिषु वृत्तीने आपले मार्ग शोधले. घरात राहूनच व्यापार, शिक्षण व नौकरी करण्याचे मार्ग सापडले. टाळेबंदी काळात व नंतरही ऑनलाइन हा जीवनव्यवहारातील महत्वाचा शब्द बनला. विशेषत: शिक्षणाच्या बाबतीत तर सर्व काही भार ऑनलाइन माध्यमावरच होता. मात्र वर्षभरानंतरच्या कालावधी नंतर ऑनलाईन पर्यायाच्या बाबतीत सविस्तर विचार होणे आवश्यक आहे. याचे कारण असे की, ऑनलाईन शिक्षणाच्या जश्या जमेच्या बाजू आहेत तश्या  कमतरताही प्रकर्षाने दिसून येत आहेत.

  • JNU Delhi : विद्यापीठ की विश्रामगृह ?

    जो व्यक्ती सुखाच्या मागे धावतो त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही अन ज्याला ज्ञान प्राप्त करायचे आहे त्याने सुखाचा त्याग केला पाहिजे. विद्या प्राप्त करायची असेल तर सुख कसे मिळेल ?देशातील केंद्रीय विद्यापीठात जो काही गोंधळ चालू आहे त्या पार्श्वभूमीवर हे सुभाषित लक्षात घेण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या या प्रामुख्याने सोई-सुविधा संदर्भात आहेत. आणि जर मुद्दा केवळ फीवाढी संदर्भात असेल तर त्याला कमवा व शिका सारख्या योजना राबवून मार्ग काढता येऊ शकतो. जे की, देशातील बहुसंख्य विद्यार्थी करतात. परंतु येथे प्रश्न असा आहे की, मुळात शिक्षण प्राप्त करणे हे अंतिम ध्येय आहे का ? असे असते तर अन्य कुठलेही प्रश्न उपस्थित झाले नसते. मुळात विद्यापीठ हे आंदोलन करण्यासाठी नसून ज्ञान प्राप्त करण्यासाठी आहे हेच आपण विसरून चाललो आहोत की काय अशी शंका निर्माण होत आहे.

  • Anti National Slogans : अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार

    Anti National Slogans : अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे . प्रत्येक नागरिक स्वत:च्या इच्छेनुसार बोलू, लिहू शकतो. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला प्रदान केलेला तो अधिकार आहे. म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याशिवाय लोकशाही ही कल्पनाच करता येत नाही. यामुळेच भारतात विविध मतप्रवाह, वेगवेगळ्या वैचारिक भूमिका यांच्यात खंडन-मंडन चालू असते. सत्ताधारी पक्षाच्या  मताविरुध्द  वैचारिक मांडणी ,भाषणे देणे, विरोध करणे, मोर्चे, रास्ता रोको करणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होता येते. लोकशाही व्यवस्था प्रगल्भ असल्याचे हे लक्षण आहे. लोकशाही मतालाही व्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे झाले अधिकाराचे पण कर्तव्याचे काय ?

  • Gender Inequality: विद्यापीठीय बंदीशाळा

    Gender Inequality: भारताला ज्या काही मोजक्या बाबींमुळे संपूर्ण जगात सन्मान मिळतो, त्यातील प्रामुख्याने उल्लेख करावा असे तक्षशिला व नालंदा येथील विद्यापीठे आहेत. ज्या ठिकाणी विद्यार्थ्याना तत्वज्ञान, कला, विद्या यांचे शिक्षण मिळण्याची सुविधा होती. मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा होती. येथील आचार्य हे महान तत्वज्ञ व तसेच प्रकांडपंडित होते. एका अर्थाने विद्यार्थ्याचे जीवन घडविणारी ही संस्कारपीठे होती. भारताच्या…

  • Teachers day: शिक्षक नावाचे विद्यापीठ

    Teachers day: समाजामध्ये ज्या व्यक्तींना सर्वात जास्त मान -सन्मान व एका अर्थाने समाजावर ज्यांचा नैतिक दरारा आहे त्यामध्ये शिक्षकांचा क्रमांक सर्वात वरचा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पालकानंतर शिक्षक अशी एक व्यक्ती असते  जीच्याबद्दल आपल्या मनात  कायम  आदराचे स्थान असते. याचे कारण पौगंडावस्थेत असलेल्या आपल्या बेधुंद मनाला आकार देण्याचे सृजनशील कार्य शिक्षक करतात.

  • Students Elections : विद्यार्थी निवडणुकांचे खरे लाभार्थी कोण ?

    Students elections politics : कुठलाही सार्वजनिक निर्णय घेत असताना विशेषत : ज्याचा खोलवर परिणाम महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर पडणार असल्यास असा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे हि निर्णय कर्त्यांची जबाबदारी असते.सध्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरु करण्याचा विचार होत आहे.निवडणुकीने खरच विद्यार्थ्यांना लाभ होईल कि कार्यकर्त्यांची वानवा असलेल्या पक्षांना तयार कार्यकर्ते मिळतील? हा खरा प्रश्न आहे.

  • Teachers : शासकीय कर्मचारी नको; गुरुजी पाहिजेत

    Teachers need for nation building : असे म्हणतात कि, शिक्षकाच्या एका पायात विकास तर दुसऱ्या पायात विनाश असतो. म्हणजेच एका शिक्षकाने ठरवले तर राष्ट्रनिर्माण होऊ शकते आणि शिक्षक बिघडला तर विनाश होण्यासही काही वेळ लागत नाही.सध्या तरी शिक्षक,प्राध्यापक वर्ग वेगाने आपला दुसरा पाय पुढे टाकत आहे. याचा दाखला देणारी घटना नुकतीच औरंगाबाद शहरात घडली.दोन शिक्षकात हाणामारी होऊन त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला.हि एकच घटना नाही तर महाविद्यालय परिसरात मारहाण, प्राथमिक शाळेत लैंगिक शोषण अशा अनेक घटनांनी राज्यातील शिक्षण क्षेत्र हादरवून जात आहे.

  • Ideal teachers: शिक्षक या पदाचे वाढते अवमूल्यन

    Ideal teachers quality : सृष्टीची निर्मिती झाल्यापासून संबंध मानवजातीत माणूसपण आणण्यासाठी , ज्ञान देऊन प्रगल्भ करण्यासाठी गुरु, शिक्षक हि संस्था ज्ञानदान करत आलेली होती .त्यासाठी आवश्यक अभ्यास ,चिंतन करून इतरांना ज्ञान देण्यासाठी कष्ट करण्याची समर्पित वृत्ती असणारे ते एक चालते बोलते विद्यापीठ होते. बोले तैसा चाले याचा एक आदर्श वस्तुपाठ होते. मानवाच्या प्रगतीसाठी संशोधन करून विविध शास्त्रांचा विकास व्हावा हा निर्मळ हेतू त्यामागे होता. नैतिक मुल्यांची जपणूक तर त्यांच्या जगण्याचे मुलभूत अधिष्ठान होते. त्यामुळे समाजातील नैतिक व सांस्कृतिक वातावरनाचे नेतृत्व शिक्षकांकडे होते. थोडक्यात काय तर त्यागी वृत्तीचा शिक्षक, प्राध्यापक हा सृजनशील समाज निर्मितीचा पाया होता.