व्यक्तिविशेष

  • प्रज्ञासूर्याची किरणे

    प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख–दुःखाचे,मान–सन्मानाचे  प्रसंग येत असतात. आपल्या व्यक्तीमत्वाची परीक्षा  ख–या अर्थाने प्रतिकूल परिस्थितीत होत असते. बहुतेक जन परिस्थितीला दोष देऊन प्रवाहात सामील होतात. काहीजण परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नास सुरुवात करतात मात्र काही कठीण प्रसंगी धीर खचून हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून देतात. मात्र इतिहास असेच व्यक्ती घडवतात की जे कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्याचा धैर्याने सामना करत परिस्थितीत अनुकूल बदल घडवून…

  • राजे आम्हाला माफ करा ….

    आम्हाला याची पुर्ण खात्री आहे की, हे शब्द आपल्याला आवडणार नाहीत; परंतु तरीही आपल्यासमोर उभे राहिल्या नंतर खोटे  बोलता येत नाही. रायगडावर चढताना प्रत्येक पाउलावर आपल्या अतुल्य शौर्याची,सामर्थ्याची जाणीव होत होती. कानामध्ये वीर रसाची स्फुर्तीगीते ऐकू येत होती. आपल्या शौर्याची जीवंत साक्षीदार असलेली,  आपल्या पदस्पर्शाने पावन झालेली मातीतून एक वेगळाच दिव्य स्पर्श जाणवत होता.डोळ्यासमोर पराक्रमी…

  • वसा विवेकानंदांचा

    भारतभूमी ही वीरप्रसवा आहे. आजपर्यंत या भूमीत अनेक वीरांनी जन्म घेतला.केवळ भारतालाच नव्हे तर समस्त जगाला आपल्या ज्ञान प्रतिभेने, अतुल्य कर्तृत्वाने आकर्षित केले. समाजजीवनाचा अभिन्न भाग असलेल्या कला,साहित्य,क्रीडा,समाजकार्य,अधात्म,व्यापार-उद्योग   अशा सर्वच क्षेत्रातील सर्वोच्च ठिकाणी स्थान प्राप्त केले. अशा भारतभूमीत पश्चिम बंगाल मध्ये जन्म घेतलेल्या एका नरेंद्र नावाच्या मुलाने भारत भूमीला पावन केले. किशोरवयात असतानाच स्वत:मधील अचाट बुद्धीमत्तेचे,एकाग्रतेचे दर्शन…

  • स्वामी विवेकानंद : स्फूर्तीदायी स्मरण

    प्रत्येक जण धावत असतो.पैसा, मान सन्मान, सत्ता, प्रसिद्धी मिळवल्यानंतरहि कशाची तरी कमतरता जाणवते.कारण जायचे कुठे आहे? आणि ते ध्येय स्वत:स निश्चितपणे जाणून, तपासून घेतले आहे का ?अशा प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच येण्याची शक्यता आहे. हि कमतरता नेमकी काय आहे हे कळण्यासाठी किंवा मानवजन्माची सार्थकता कशात आहे हे समजण्यासाठी स्वामीजींचे स्मरण आवश्यक ठरते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात दिव्यता येण्यासाठी कार्यरत असले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असणारी…