जातीनिहाय जनगणना

जातीनिहाय जनगणना
देशात जातीव्यवस्था बळकट करण्याच्या द्रष्टीने सरकारचे आणखी एक पाऊल. आजपर्यंत देशातील सर्व समाजसुधारकांनी जातीव्यवस्थेचे भूत नष्ट करण्याच्या उद्देशाने गेली अनेक वर्षे प्रयत्न केले.त्या अथक परिश्रमांना आत्ता कुठे यश मिळताना दिसू लागले होते.जागतिकीकरणाच्या रेट्यात समाजातून जात ही संकल्पना नाहिशी होताना दिसत होती, परंतू देशातील अत्यंत खालच्या स्तरावरचे राजकारण तसेच दूरद्र्ष्टीहीन नेते,यांनी केवळ स्वत:च्या स्वार्थापायी देशातील जातीव्यवस्था मुद्दामहून जिवंत तर ठेवलीच शिवाय वेळोवेळी तिला बळकटी आणण्यासाठी विशेष कष्ट घेतले.कारण जात हे एकच असे गणित आहे ज्यामूळे या बेशरमांचे नेतेपण टिकून आहे.जात आहे तर मते आहेत, आणि मते असल्यामूळे ते आहेत. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या टि.सी.वरील जातीचा रकाना आहे, तोपर्यंत या देशाला लागलेली जातीची कीड नाहिशी होणे शक्य नाही.कारण शाळेत असताना प्रथम जात हा काय प्रकार आहे तो कळतो.
पैश्यासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा हेच ज्यांच्या जीवनाचे सूत्र बनले आहे, त्यांना देशाचे काहीही झाले तरी त्याच्याशी काय देणेघेणे.पण देशातील ज्या लोकांना काही चांगले व्हावेसे वाटते ते का गप्प आहेत हा खरा प्रश्न आहे.त्यांची निष्क्रीयता हीच दुर्जनांची खरी शक्ती होत आहे. सज्जनांचा संयम हा आता षंढपणाचे रूप घेत आहे.आपल्या डोळ्यासमोर आपल्या देशाचे असे हाल होताना आपण फ़क्त प्रेक्षक बनून पाहत राहायचे, की आपल्या आहे तेवढ्या शक्तिने त्याचा सामना करायचा.
याबाबतीत निराश झालेल्या कार्यकर्त्यांना एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलेली गोष्ट मला आपल्याला सांगाविशी वाटते.
एका जंगलामधील एका झाडावर एका चिमणीचे घरटे असते.एके दिवशी त्या जंगलाला मोठी आग लागली, सारे जंगल भस्मसात होऊ लागले.ज्या झाडावर त्या चिमणीचे घरटे होते ते झाडसुद्धा नष्ट होत होते.त्या चिमणीला या दुर्दैवी घटनेकडे अगतिकपणे पाहण्यावाचून पर्याय नव्हता.तीची शक्ती ती केवढी आणि हा वणवा केवढा मॊठा.
परंतू अशा परिस्थितीमध्येही ती चिमणी आपले पंख पाण्यात भिजवून येत होती आणि त्या महाकाय आगीत आपले पंख फ़डफ़डत होती.इतरांनी तिला वेड्यात काढत प्रश्न विचारला की, तुझ्या त्या थेंबभर पाण्याने ही आग विझणार आहे का?तू का उगाच प्रयत्न करतेस?
तेव्हा त्या चिमणीने उत्तर दिले ते फ़ार महत्वाचे आहे. चिमणी म्हणाली
“मला याची पूर्ण जाणीव आहे की, माझ्या या प्रयत्नांनी फ़ारसा फ़रक पडणार नाही.निसर्गानेच मला तसे बनवले आहे.पण ज्या वृक्षाने मला आश्रय दिला.ते माझ्या डोळ्यासमोर नष्ट होत आहे व मी फ़क्त बघत बसू.हे मला जमणार नाही.मी माझ्या सर्व शक्तीनीशी या संकटाला तॊंड देणार आहे.या प्रयत्नात कदाचित माझ्यावार मरण ओढवले तरीही मला दुःख नाही.”
मला असे वाटते की प्रत्येक भारतीयाने स्वत:च्या आचरणात हा विचार आणला तर देशाला कुणाचीही भिती नाही.या देशाला परमवैभवापर्यंत नेण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.


Related Posts

Religion for Nation : सुशिक्षितांचा (?) अधर्म

Religion for Nation: नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षणाची…

एप्रिल 22, 2026

Modernity Humanity: आधुनिकता, अंधानुकरण आणि माणुसकीची हत्या

Modernity Humanity ends : समाजात सत्ता, पैसा आणि अनैतिक कृत्यांमुळे…

जुलै 16, 2025

Digital Revolution : सोशल मीडिया: डिजिटल क्रांती की अराजकाची नांदी

Digital revolution or prelude to chaos: आधुनिक तंत्रज्ञानाच्या जाळे आता…

जुलै 27, 2022

Cry of democracy: लोकशाहीचा टाहो

cry of democracy in india: (अत्यंत अपमानास्पद असणारे काली या…

जुलै 5, 2022
2 Comments Text
  • छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे काय खालच्या दर्जाचे नेते आहेत अस मला वाटत नाही. असो, पण मी सुद्धा तुमच्याच मताचा आहे. आणि कोणीही याच मताचा असेल. जातपात पाळू नका. पण जातीवर आरक्षण हवं. जातीचे नाव काढायचे नाही. पण शाळेत नाव घालतांना जात विचारतात. जातीला आजकाल ‘समाज’ हे गोंडस नाव दिले आहे. बर प्रत्येक नेत्याला आपल्या जातीवर अन्याय होतो असंच वाटत. कॉंग्रेस, भाजप आणि जवळपास सर्वच पक्ष ज्या त्या ठिकाणी ज्या जातीचे लोक जास्त तिथे त्यांचा उमेदवार, असंच चालू आहे. त्याला पर्याय एकचं वाटतो. आपणच काही तरी अस करायचे जेणे करून हे नेते जिवंतच राहणार नाहीत. कारण हे नेते जोपर्यंत आहेत. तोपर्यंत देशाचा कोणताच प्रश्न मिटणार नाही.

  • जातीनिहाय जनगणना होईल पण धर्मनिहाय जनगणना कधी होणार? धर्म हा विषय सामाजिक नसून वैयक्तिक आहे आणि सामाजिक व्यवस्थेत त्याला स्थान असू नये.

  • Leave a Reply

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत