Chhatrapati Shivaji Maharaj Mavla : शिवबांचा मावळा
Chhatrapati Shivaji Maharaj Mavla : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्ष जगणारा, त्यांचे कार्य पुढे नेणारा मावळा कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे परभणी येथील शंकरअण्णा देशमुख.
Chhatrapati Shivaji Maharaj Mavla : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्ष जगणारा, त्यांचे कार्य पुढे नेणारा मावळा कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे परभणी येथील शंकरअण्णा देशमुख.
Religion for Nation: नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षणाची व्याख्या करताना म्हटले आहे की, व्यक्तीच्या भावभावनांचे क्षेत्र व्यापक होणेम्हणजे शिक्षण. या व्याख्येमधून टागोरांनी शिक्षण क्षेत्राने उद्दिष्ट्य अतिशय समर्पक शब्दात सांगितले आहे. प्राथमिक शिक्षणात पायाभरणी करून माध्यमिक शिक्षणात मुख्य संस्कार व्हावेत व उच्च शिक्षण घेताना हे उद्दिष्ट्य साध्य व्हावे जेणेकरून एका सदृढ, संवेदनशील समाजाची निर्मिती होऊ शकेल….
Swami Vivekanand : विवेकानंदांचा धर्म या दै. लोकसत्ता मध्ये प्रकाशित लेखात दत्तप्रसाद दाभोळकर यांनी दावा केला आहे की, शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले नव्हते. त्याला प्रतिवाद करणारा हा लेख.
Sai Baba : भिक्षा माई…. का कुणास ठाऊक पण एरवी सहज वाटणाऱ्या या आवाजामध्ये आज एक विशेष आकर्षण जाणवले अन कुतूहलापोटी बाहेर जाऊन बघतो तर डोक्यावर फडके बांधलेले एक साधूबाबा होते. त्यांना बघून अंत:करणात शांतता निर्माण झाली. संसारी धावपळीने शीण गेल्यासारखा वाटला. बाबा, ओ, बाबा (माझ्या आवाजाने त्यांची तंद्री तुटल्यासारखे वाटले.) अत्यंत आल्हाददायक नजरेने कटाक्ष…
Happiness Index : जागतिक पातळीवर वेगवेगळ्या मुद्यांच्या अभ्यासासाठी सर्वेक्षण, पाहणी केली जाते. कधी उत्कृष्ट गुणवत्ता असलेली शैक्षणिक संस्था शोधण्यासाठी तर कधी पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. जगातील सर्वाधिक आनंदी देश शोधण्यासाठी जागतिक पातळीवर नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले. ज्यामध्ये त्या देशातील नागरिकांच्या आनंद व समाधान याबाबतीत पाहणी करून क्रमवारी तयार करण्यात आली. या यादीत भारताचा क्रमांक ११७ वा असल्याचे सांगितले गेले. अर्थात भारतासारख्या बहुरंगी, बहुढंगी व लोकजीवनात पावलापावलावर विविधता आढळणा-या या देशात आनंद व समाधान यासारख्या मानसिक पातळीवरील बाबीसंबंधात काही निवडक लोकांना प्रश्न विचारून संबंध देशाविषयी अनुमान काढणे कितपत व्यवहार्य आहे याबद्दल निश्चितपणे शंका निर्माण होऊ शकतात. खरे पाहता मुळातच या पाहणीचे प्रयोजन फारच गमतीशीर वाटते.
Rampal Story: अनादिकाळापासून मानवसमुह धर्मभावनेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने जोडला गेलेला आहे. समाजमनावर धर्मसत्तेचा मोठा प्रभाव होता किबहुना आजही आहे. नैतिक -अनैतिक संकल्पना, सृष्टीची उत्पत्ती, कार्यकारण भाव, कर्म त्याचा परिणाम या सर्वांची चर्चा,ज्ञान तत्वांच्या द्वारे धर्माच्या माध्यमातून समाजमनावर मांडली जाते.व्यक्तीची जाणीव विस्तारली जावी, त्याला आपल्या अस्तित्वाचे कारण उमजावे व जीवनध्येय साध्य करण्याचा मार्ग सापडला जावा ज्यामुळे त्याचे आचरण आदर्श होऊ शकेल याकरिता धर्माचे निमित्त आहे. साधारणपणे असे म्हणता येईल की, धर्म म्हणजे आदर्श आचारसंहिता अथवा अशी तत्वे ज्यामध्ये सर्व जीवांचे कल्याण सामावले आहे. परंतु भारतीय समाजमनावर प्रबळ असलेल्या धार्मिक भावनेचा अनेक जण दुरुपयोग करताना दिसत आहेत.
Diwali festival : भारतीय संस्कृती वैभवशाली होण्यात सन उत्सवांचा मोठा वाटा आहे. उत्सवाच्या निमित्ताने मानवाचे केवळ मानवाशीच नव्हे तर निसर्ग, प्राणी या सर्व घटकांशी आपले भावनिक नाते दृढ करता येतात. नात्यांना उजाळा मिळतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात विविध समस्यांना तोंड लागते. गरजा पुर्ण करण्याच्या धडपडीत अनेकवेळा आयुष्य हे एखाद्या मशीन सारखे यांत्रिक होते.
Pandharpur Wari: महाराष्ट्र हा शब्द उच्चारला, की डोळ्यांसमोर गणेशोत्सव व पंढरपूरच्या वारीचे चित्र उभे राहते. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे अभिन्न अंग आहे व त्याचे मुख्य सूत्र वारी हे आहे.
आयुष्यात गरिबी सारखा मोठा शिकवणी वर्ग कोणताच नाही. गरिबी म्हणजे आळस नक्कीच नाही. पैशाअभावी शिक्षण नाही अन शिक्षण नाही म्हणून पैसा नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. आपण अशाही परिस्थितीत संकटांचा सामना करत हसतमुखाने वर्तमानाला सामोरे जाणारे परिवर्तन घडवतात. आणि अशा गरिबीच्या शिकवनीतुन शिकलेला विद्यार्थी प्रगल्भ,संवेदनशील होतो. ज्याची आज समाजाला खूप मोठ्या प्रमाणात…
मानव विचार करू शकतो त्याच्यात जिज्ञासा, चिकित्सक वृत्ती आहे, बरे-वाईट ठरवण्याची,निवडण्याची आणि त्याप्रमाणे आचरण करण्याची क्षमता आहे. आणि याच्याही पुढे जाउन असे म्हणता येईल की, मनुष्यत्वाचा संपूर्ण विकास करण्याची अफाट शक्यता आहे. स्वत:ला पूर्णपणे जाणून घेण्याच्या या प्रवासात,या प्रयत्नात आपले मानवजन्माचे अंतिम उद्दिष्ट्य असले पाहिजे. यामुळेच आपल्या शास्त्र ग्रंथाची ची सुरुवात कोहम ? म्हणजेच मी…