Marathwada Graduate Constituency : मराठवाड्यात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने
Aurangabad Graduate Constituency Election 2026 : औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीत महायुतीचे पारडे जड असताना महाविकास आघाडीतील दोन पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यातच खरी लढत होण्याची शक्यता आहे. निवडणूक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून मतमोजणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी Woodstrem Decar LLP, एम.आय.डी.सी. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.