Abhijeet dipke Interview : देशातील विरोधी पक्षांचा लाडका असलेला अभिजीत दिपके याने लोकसत्ता संवाद कार्यक्रमात बोलताना सांगितलं की Talent is myth, Merit is myth. जे यशस्वी होतात त्यांच्याकडे privilege असत.
Loksatta loksamwad : लोकसत्ता वृत्तपत्राच्या लोकसंवाद कार्यक्रमात संपादक गिरीश कुबेर यांनी दिपके यास म्हणाले की, काही जातीतले श्रीमंत असण्यासाठी जन्माला आले आहेत आणि काही गरीबीसाठी
(खरेतर या वाक्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. अशी कोणती जात आहे की त्या जातीत श्रीमंत असण्यासाठी जन्माला आले आहेत ? आणि अशी कोणती जात आहे की ज्या जातीमध्ये 100% गरीब आहेत? ) त्यावर उत्तर देताना दिपकेने सांगितले की, देशातील विरोधी पक्षांचा लाडका असलेला अभिजीत दिपके याने लोकसत्ता संवाद कार्यक्रमात बोलताना सांगितलं की Talent is myth, Merit is myth. JEEE, NEET यासारख्या स्पर्धा परीक्षामध्ये जे यशस्वी होतात त्यांच्याकडे privileges असत. ग्रामीण भागातील मुलांना ते मिळत नाही.
या लिंक वर पूर्ण मुलाखत आहे : CJP ला पैसा कुठून येतो? निवडणुका लढणार का? अभिजीत दिपकेंची दिलखुलास मुलाखत | Loksamwad
Talent Vs privilege: इतिहास घडवणा-यांकडे Talent होत की privilege?
या संवादातील अतिशय धक्कादायक विधान म्हणजे Talent is myth, Merit is myth हे आहे. या एका वाक्याने आयुष्यात संघर्ष करत स्वतःच्या गुणवत्तेवर विश्व निर्माण करणाऱ्या त्या सर्वच गुणवंताना अपात्र ठरवले आहे. विशेषतः privileges चा विचार करता देशात,राज्यात असे अनेक महापुरुष होऊन गेले ज्यांच्याकडे कोणतेही privileges नव्हते. राजकीय नेते, समाजसुधारक, उद्योजक, शिक्षणतज्ञ, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी असे अनेक प्रेरणादायी उदाहरणे आहेत की ज्यांनी स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर इतिहास घडवला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांपासून ते अगदी माजी राष्ट्रपती स्व.डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनचरित्र परिचित आहे. तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवून IAS,IPS होणाऱ्यापैकी अनेकजन अतिशय संघर्ष करून तिथपर्यंत पोहोचतात. ते केवळ गुणवत्तेच्या बळावर. त्यांच्यापैकी बहुतेक जण ग्रामीण भागातून आलेले असतात. विद्यमान राजकीय परिस्थितीचा विचार केला तर देशाच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणते privileges होते ? याउलट privileges चे खरे उदाहरण म्हणजे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी आहेत. परंतु त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीबद्दल आपण ज्ञात आहोत. म्हणजेच Talent हे myth नाही. गुणवत्ता असेल तर संधी निर्माण होऊ शकतात आणि केवळ privileges च्या आधारावर यश मिळवता येत नाही त्यासाठी Talent असावेच लागते.
केवळ शहरात आल्याने privileges मिळाले असते आणि त्या आधारावर यश मिळाले असते तर शहरातील प्रत्येक घरातील व्यक्ती यशाच्या शिखरावर असता आणि ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती बेदखलच राहिला असता. ग्रामीण भागातील शाळामध्ये दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे हे अपेक्षा रास्त आहे, पण म्हणून त्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय होते असा सरसकट निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेतलेला विद्यार्थी रोजगारासाठी शहरात येतो आणि अभ्यास करून यश मिळवल्याचेही उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत.
Kanhaiyyakumar : कन्हैय्याकुमार आठवतो का ?
विरोधक हा लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे. शासनकर्त्यावर त्यांचा दबाव असायला हवा. यासाठी स्वतःचे दूरदर्शी नेतृत्व, व्हिजन आणि पॉलिसी लोकाभिमुख आणि स्पष्ट असायला हवी. परंतु याचा अभाव असला की, विरोधक गोंधळलेल्या अवस्थेत असतात. येन केन प्रकारे सरकारचा विरोध करायचा हा अजेंडा होतो आणि नेतृत्व कमकुवत असले की, कोणीही विरोध केला तरी त्याच्याकडे आशाळभूत नजरेने बघितले जाते. विरोधी पक्षांना सध्या असाच एक लाडका चेहरा सापडला आहे. तो म्हणजे अभिजित दिपके. त्याच्याअगोदर कन्हैया कुमार लाडका होता.परंतु त्याची हवा ओसरल्यानंतर आत त्याची जागा अभिजित दिपकेने घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एक टिप्पणी करतात आणि त्याची टर उडवण्यासाठी अमेरिकेत असणारा युवक समाजमाध्यमावर अभियान चालवतो आणि त्यामध्ये विरोधी पक्षाला स्वत:चे अस्तित्व टिकवण्याची संधी दिसावी, विरोधी पक्षांचे याहून मोठे दुर्दैव कोणते असेल ?
Also read : याला म्हणतात खरी हुकुमशाही
सोशल मिडीया पोस्ट मुळे इराणी तरुणी नजमेह अमिनीला थेट मृत्यूदंडाची शिक्षा
हा भारत आहे, नेपाल,बांगलादेश नाही
निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांसारख्या संविधानिक संस्थावर आरोप करून अविश्वास निर्माण केला जात आहे. त्यांची एकुणच आंदोलनाची कार्यपद्धती बघता त्यांच्यासमोर नेपाल, बांगलादेश मध्ये जे झाले त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. परंतु त्यांनी लक्षात ठेवावे की, हा भारत आहे. तुम्ही इथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर गलिच्छ आरोप, शिवीगाळ करू शकता. ज्या जनतेने बहुमताने त्यांना निवडून दिले आहे, ती जनता हे सर्व पाहत आहे आणि सहनही करत आहे. त्यांनी जनतेच्या संयमाची परिक्षा बघू नये. त्यांना जसे वाटते तसे नेपाळ किंवा बांगलादेश प्रमाणे परिस्थिती निर्माण करणे कधीही शक्य होणार नाही.



