Social Media Threat : शेख तो झांकी है…

social media threat


Social Media Threat: कोणी शेख नावाच्या व्यक्तीने फेसबुक वर बनावट अकाउंट काढले आणि त्यामाध्यमातून द्वेषमूलक पोस्ट केल्या असा आरोप केला जात आहे. स्वत:ची ओळख लपवून अजेंडा चालवणे व तरुणांची माथी भडकावणे हे काही एकट्याचे काम नाही, ती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चाललेली कार्यपद्धती आहे. येणाऱ्या काळात देशाला, समाजाला आणि लोकशाही व्यवस्थेला सर्वात मोठा धोका बनावट अकाउंट चा असणार आहे.

Social Media Market: भारत : सोशल मीडियाची जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ

Social Media Threat

रॉयटर्स च्या वृतानुसार सप्टेंबर २०२५ पर्यंत भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटी पर्यंत पोहोचली आहे. तर सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या ५० कोटी आहे. त्यांचा स्क्रीन टाईम हा अडीच तास ते सात तासापर्यंत आहे. ग्राहकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारी, मनोरंजन, सुविधा देणाऱ्या अप निर्माते व जाहिरातीचे सर्वात प्रभावी माध्यम असल्यामुळे जगभरातील उद्योजकांना या बाजारपेठेने आकर्षित केले आहे. तर एवढ्या प्रचंड मोठ्या लोकसमूहाशी थेट संपर्क साधण्याची संधी उपलब्ध असल्यामुळे समाजविघातक शक्तींचेही याकडे लक्ष असणे अतिशय स्वाभाविक आहे. आणि कुठल्याही तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करण्यात अशा शक्ती अतिशय तरबेज असतात.

War Strategy: युद्धतंत्र आणि युद्धभूमी बदलली

प्रत्यक्ष युद्धभूमीवर सैन्य पाठवून शत्रूसैन्याशी लढाई करण्यात वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात लागतो. त्यापेक्षा शत्रूदेशातील नागरिकांची माथी भडकावून अंतर्गत बंडाळी अथवा अराजकता निर्माण करणे हे प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढाई करण्यापेक्षा कधीही सोपे आहे. संवेदनशील मुद्द्यावरून नागरिकांमध्ये परस्पर द्वेष निर्माण करणे आणि शासन व्यवस्थेविरुद्ध भडकावणे हे सोशल मिडीयावरून सहजसाध्य आहे. त्यासाठी आवश्यक आहे ते फक्त बनावट अकाऊट. आधुनिक जगातील हे युद्धतंत्र आहे आणि युद्धभूमी म्हणजे सोशल मीडिया. याचे उदाहरण आपण बांगलादेश, नेपाळ, फ्रांस,इटली देशात प्रत्यक्ष बघितले आहे.

Also read : BRICS New Delhi Summit : नाम ते ब्रिक्स ; भारताच्या परराष्ट्र धोरणाचा चढता आलेख

sheikh is just the beginning: शेख ची मेख

प्राथमिक माहितीनुसार, शहाजी पाटील नावाने असेच एक बनावट अकाऊट कार्यरत होते. त्या माध्यमातून अतिशय नियोजनबध्द पद्धतीने संवेदनशील विषयावर पोस्ट केल्या जात होत्या. शेख नामक व्यक्तीच हे बनावट अकाऊट चालवत होता असा आरोप केला जात आहे. शेख हा व्यक्ती अतिशय हुशारीने पोस्ट करतो. यामध्ये प्रामुख्याने उघडपणे ब्राह्मणविरोधी मजकूर असतो. मराठ्यांचा पराक्रमी इतिहास असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र असो, जिथे संधी मिळेल तिथे बुद्धीभेद करणे ही याची पद्धत. समाजसुधारकांच्या काठीने हिंदू धर्मातील आदर्शावर, राष्ट्रपुरुषांवर शिंतोडे उडवणे, प्रतिमाहनन करण्याचे प्रकार सातत्याने फेसबुक पोस्ट मधून दिसून येतात. फुले,शाहू,आंबेडकर या महापुरुषांचे नाव घेऊन ब्राह्मणविरोधी मजकूर लिहितो. यामधून बहुजन समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न शेख करतो. भीमा-कोरेगाव, मराठा आरक्षण यासारख्या संवेदनशील विषयावर व्यक्त होताना हिंदू,ब्राह्मण याविषयी द्वेष निर्माण होतील, मराठा -ब्राह्मण यामध्ये जास्तीत जास्त कटुता निर्माण होईल अशाच पद्धतीचा मजकूर दिसून येत होता. वास्तविक शेख ला त्याच्या धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी खूप मोठा वाव आहे. मात्र त्याला त्याच्या धर्मात सुधारणा करायच्या आहेत असे दिसून येत नाही.

KYC हाच एकमेव उपाय

पोस्टकर्ता कोण आहे ? हे जोपर्यंत लपवून ठेवण्याची सोय आहे. तोपर्यंत समाजविघातक, द्वेषमूलक मजकूर वारंवार निर्माण होणार. बनावट अकाऊट च्या माध्यमातून केवळ मजकूरच नाही तर कितीतरी अवैध कामे केली जात आहेत. नशेची साधन विक्री, अनैतिक व्यापार, दहशतवादी संघटनांची भरती, संदेशवहन, बैठका या अशा कितीतरी देशविघातक कामांचा आश्रय सोशल मीडिया व त्यावरील बनावट अकाऊट आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनात सोशल मीडिया कंपन्यांनी शासनविरोधी मजकुरास प्रोत्साहित केल्याचे त्यांनी अधिकृतरीत्या मान्य केले आहे. म्हणजे एखादी विदेशी कंपनी व्यावसायिक फायद्यासाठी शासन व्यवस्थेला, संविधानिक संस्थाना उध्वस्त करू शकते हे सिद्ध झाले.

अशा प्रकाराना थांबवायचे असेल तर वापरकर्त्याची ओळख लपवण्याची सुविधा बंद करावी लागेल. जगातील काही देशात अशा पद्धतीने सोशल मीडिया वापराचे नियम लागू करण्यात आले आहेत.

संपूर्ण ओळख पटवणे अनिवार्य असलेले देश (Mandatory Real-Name & ID Verification)

या देशांमध्ये सोशल मीडिया खाते उघडण्यासाठी किंवा वापरण्यासाठी नागरिकांना त्यांचे अधिकृत सरकारी ओळखपत्र किंवा फोन नंबर जोडणे बंधनकारक आहे:

दक्षिण कोरिया (South Korea). दक्षिण कोरियामध्ये ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी डिजिटल आयडी (Digital ID) किंवा रेसिडेंट रजिस्ट्रेशन नंबरद्वारे वापरकर्त्यांची ओळख निश्चित केली जाते.

चीन (China). चीनमध्ये २०१७ पासून ‘सायबर सुरक्षा कायद्यानुसार’ रिअल-नेम व्हेरिफिकेशन (Real-name verification) अनिवार्य आहे. येथे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाते उघडण्यासाठी नागरिकांचे राष्ट्रीय ओळखपत्र आणि फोन नंबर लिंक करणे बंधनकारक असते.

व्हिएतनाम (Vietnam). व्हिएतनाम सरकारने २०२४ च्या अखेरीस ‘डिक्री १४७’ (Decree No. 147) लागू केला आहे. यानुसार फेसबुक, टिकटॉक यांसारख्या सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांना त्यांचा मोबाइल नंबर किंवा राष्ट्रीय ओळखपत्र क्रमांक वापरून ओळख पटवणे अनिवार्य आहे.

रशिया (Russia). रशियन कायद्यानुसार, मेसेजिंग ॲप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यासाठी वापरकर्त्याचा मोबाइल क्रमांक आणि सरकारी ओळखपत्राची पडताळणी करणे बंधनकारक आहे.

मलेशिया (Malaysia). ऑनलाइन सुरक्षा कायद्यांतर्गत (Online Safety Act 2025) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वय आणि ओळख पटवण्यासाठी अधिकृत सरकारी ओळखपत्र (MyKad) किंवा पासपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे.


Related Posts

Pathri News : पतीचे पक्षांतर, नगरसेविका म्हणतात मी काँग्रेसमध्येच…

pathri News : पतीचे पक्षांतर, नगरसेविका म्हणतात मी काँग्रेसमध्येच. सोमवार,दि.…

Nov 16, 2026

Chhatrapati Shivaji Maharaj Mavla : शिवबांचा मावळा

Chhatrapati Shivaji Maharaj Mavla : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्ष…

Oct 16, 2026

Abhijeet dipke Interview: टॅलेंट असं काही नसतं ?

Abhijeet dipke Interview : देशातील विरोधी पक्षांचा लाडका असलेला अभिजीत…

Oct 14, 2026

Marathwada Graduate Constituency : मराठवाड्यात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने

Aurangabad Graduate Constituency Election 2026 : औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीत…

Oct 9, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *