Political Satire: ठाकरे चित्रपट अन दोन प्रेक्षकांची गुफ्तगू …..

Political Satire: देशाच्या व विशेषत: राज्याच्या राजकारणात धृवपदी असलेल्या हिंदूहृदय सम्राट यांच्या जीवनावरील प्रदर्शित झाला अन दोन दिग्गज प्रेक्षकांमधला संवाद दस्तुरखुद्दांच्या कानी पडला.

फोनची बेल वाजली (तुतारीचा आवाज) होता. बेल ऐकून क्षणभर छान वाटले अन रिसीव्ह केला.

पलिकडून : (‘जय महाराष्ट्र’ असे मनातल्या मनात म्हणून) कुठे आहात सध्या ?

असे बोलणे एका कोकणस्थ व्यक्तीस लगेच कळते त्यामुळे अत्यंत क्रोधाविष्ट होऊन (वास्तविक चवताळून) त्यांनी प्रतिप्रश्न केला.

कोकणचो माणूस : सिंच्या, माका इचारणारा तू कोण हैस ? मी कोणत्याही पक्षात जाईन.

(समजावणीच्या सुरात) साहेब माझ्या बाहुतील बळ कमी झाले म्हणून माझा नंबर पण सेव्ह नाही केला तुमी ? हे बरोबर नाही. आणि तुमी मुंबईत आहेत का अस विचारलं ?

कोकणचो माणूस :  तुमी असा व्हय. बोला की मग. काय काम काढले ? एक गोष्ट अगोदरच सांगतो मी तुमच्या आघाडीत येऊ शकत नाय.

पलीकडून : ते जाउद्या हो. अगोदर एक सांगा पिक्चर पाह्यला का ?

(ते बहुधा निवृतीच्या विचार करत असून आपल्यालाही तसाच सल्ला देत आहेत असे समजून टिपिकल स्टाईल मंधे )

कोकणचो माणूस : आता पिक्चर कसले बघता? आणखी रिटायर्ड नाय झालो आपण.

पलीकडून : (हलक्या आवाजात) अहो साहेबांवर पिक्चर आलाय. तो म्हणतोय.

(कोकणचो माणूस दिलदार असल्याने लगेच भावूक होत.)

कोकणचो माणूस : माका पण लै आठवण येते हो साहेबांची. पण काय करू.(या हृदयीच्या भावना  (कळ नव्हे) त्या हृदयी पोहोचल्याने आनंदी होत)  

पलीकडून : म्हणूनच फोन केला. चलायचे का ?  

कोकणचो माणूस : आता थेटरात जाणे नाय जमणार. (कोकणचो माणूस आहेच दिलदार त्यामुळे एकदम नॉस्टल्जिक वगैरे होत) कसले भारी दिवस होते ते ? काय दरारा होता साहेबांचा?

पलीकडून : साहेबांच्या बोलण्यात एक करिष्मा असायचा. आपल्याला घडवल सायेबानी.

कोकणचो माणूस : जेव्हा लाखोंच्या सभेत हात उंचावून साहेब बोलायचे न ‘माझ्या तमाम हिंदू बंधूभगिनीनो ’ तेव्हा अंगावर काटा यायचा. आपुन तेव्हा सायेबांच्या बाजूच्या खुर्चीवर असायचो. (एकदम भारी फील करत म्हणजे दोन्ही बाहूत हत्तीच बळ आल्यासारखे )

पलीकडून : अहो आपण दोघांनी आंदोलनात किती वेळा खळ खटयाक केले.

कोकणचो माणूस : हो ना. पण आता त्या फक्त आठवणी. ती मजाच वेगळी होती.  (एक लांब सुस्कारा सोडल्याचा आवाज आला अन ‘जिंदगी मे अगर रिवाइंड का बटन होता तो’ हेहिंदी पिक्चर मधले वाक्य आठवले.)

पलीकडून : मी तर किती सोसले अन अजूनही सोसतोय. (कोकणचो माणूस पण परत एकवेळ भावूक झाला.)

कोकणचो माणूस : मला पण लै त्रास होतोय. पण बोलणार कुठे? आजकालचा हा मिडीया लै बेक्कार. सिंचे माझ्या मागे बूम घेऊन फिरतात. मला स्वप्नात पण बूम दिसतो.(अत्यंत त्रासिक होऊन )

पलीकडून : मी तर स्वप्न पाहणे सोडले आहे. पण काहीही म्हणा आपण दोघे तिथे एकत्र असतो तर जाम भारी वाटले असते. म्हणून म्हणले कमीत कमी एकत्र पिक्चर तर बघू.

कोकणचो माणूस : बघू की. (एकदम सावरत) पण आपल्या बंगल्यावर या. बाहेर नको. पिक्चर बघताना पडद्यावर साहेबांची दमदार एन्ट्री झाली अन एकदम ‘अरे आवाज कुणाचा ’ अशी घोषणा कोणी दिली  तर आपल्याला राहवणार नाय.

पलीकडून :  हो, अन आपण तसलं काही बोललो तर उगाच वांदे व्हायचे. (छातीला हात लावत)साहेबांना पडद्यावर भेटण्याची उत्सुकता निर्माण झाल्याने मफलर गुंडाळत ते कोकणच्या माणसाच्या घरी निघून गेले.


Related Posts

Political Satire: एक दिन तो गुजारो गुजरात में………

Political Satire : काकासाहेब राज्यातील स्थिती बाबत अगोदरच चिंतातुर होते. टीव्ही वर वृत्त बघत असतानाच एक जाहिरात आली.  अमिताभ बच्चन यांची गुजरात पर्यटन विभागाची जाहिरात चालू होती. आईए कुछ दिन तो गुजारो गुजरात में ….  अडचणीतून सुटण्यासाठी  नियतीने हा दिलेला कौल आहे असे समजून काकासाहेब थेट उठले अन गाडीत जाऊन बसले. सोबतीला प्रफुल्ल वदनाचे भाई होतेच. गाडी थेट गुजरात मधील एका रम्य परंतु अतिशय गुप्त ठिकाणी पोहोचली.…

मार्च 29, 2021

Political Satire : एस टी त बसा अन निरोगी रहा

Political Satire: एत्तदेशीय अस्सल मराठमोळे संपादक जे की फक्त कंपाऊंडरवर…

ऑगस्ट 21, 2020

Political Satire: शकुनीचे असिस्टंट…..

Political Satire: स्थळ : बहुधा ठाणे असेल…वेळ : अत्यंत निर्वाणीची(घडाळ्यातील…

फेब्रुवारी 8, 2019

Political Satire: डिजिटल आणीबाणी आणि धन्नोभौ

Political Satire: (धन्नोभौ आपल्या कार्यालयात येरझाऱ्या घालत असताना आणीबाणी, निषेध अस…

जानेवारी 23, 2019

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत