Pathri News : पतीचे पक्षांतर, नगरसेविका म्हणतात मी काँग्रेसमध्येच…

Pathri political news

Pathri News : पाथरी नगरपरिषदेत पुन्हा एकदा पक्षांतराचा सोहळा

परभणी जिल्ह्यातील पाथरी हे गाव खरेतर साईबाबा यांची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबा यांच्या जन्मस्थानी राजकीय नेत्यांची नेतृत्वावरील श्रद्धा अतिशय कमकुवत असल्याचे दिसून येत आहे आणि म्हणून थोडीही सबुरी न ठेवता ते सातत्याने पक्षांतर करत आहेत. सोमवार,दि. 16 रोजी पाथरी नगर परिषदेतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका मंगल राजेश पाटील यांचे पती राजेश पाटील व स्वीकृत सदस्य मोईज अन्सारी यांनी मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सईद खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. मागील ३३ दिवसातील हा तिसरा पक्षप्रवेश आहे.

Rajesh Vitekar Vs Saeed Khan: विटेकर – खान संघर्ष

पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश विटेकर व शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य सईद खान यांच्यातील राजकीय संघर्षामुळे पक्षांतराचे हे सत्र सुरू आहे. विटेकर हे २०१९ मध्ये महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या मैदानात उतरले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून प्रबळ दावेदार होते.मात्र महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला जागा सुटली आणि महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली. वातावरण अनुकूल असताना खासदार होण्याची संधी चालत आलेली असताना तोंडचा घास हिरावला म्हणून महायुतीने त्यांना लगेचच विधान परिषद सदस्य केले. विटेकर यांना आमदारकी मिळाल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी विधानसभा निवडणुकीत पाथरी मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली. मात्र महायुतीमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला. पक्षाने राजेश विटेकर यांनाच मैदानात उतरवले. यामुळे नाराज झालेल्या खान यांनी रासप मध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज भरला आणि पन्नास हजारावर मतेही मिळवली. या निवडणुकीपासून विटेकर आणि खान यांच्यातील राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. प्रचारसभामधून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर झालेल्या नगर परिषद निवडणुकीत सईद खान यांचे बंधू आसेफ खान हे नगर परिषद अध्यक्षपदी निवडून आले मात्र त्यांना ७ सदस्यावर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाचे १४ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोईज अन्सारी यांना स्वीकृत सदस्य करण्यात आले. त्यानंतर झालेल्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून सईद खान यांनी उमेदवारी मिळवली. विटेकर–खान यांच्यात दिलजमाई झाल्याचे वरकरणी दिसले सुद्धा, मात्र निवडणूक निकालानंतर पुन्हा संघर्ष पेटला. पाथरी मधील पक्षांतराचे सत्र ही या संघर्षाचीच परिणीती आहे.

NCP to Shivsena: पक्षांतराच्या सत्राची सुरुवात सोनपेठमधून

पक्षांतराच्या या नाट्याची सुरुवात सोनपेठमधून झाली. सोनपेठमध्ये अध्यक्षपदी परिवर्तन आघाडीचे परमेश्वर कदम हे निवडून आले. मात्र त्यांना बहुमत प्राप्त करता आले नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रकांत राठोड यांचा पराभव केला. पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत एकूण २० पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १२ सदस्य विजयी झाले. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांचे बंधू रमाकांत राठोड यांनी १३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे शिवसेना आमदार सईद खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.

pathri news, pathri political news, rajesh vitekar, saeed khan

Also read : शेख तो झांकी है….

Shivsena to NCP : पाथरीत पडसाद

सोनपेठ मध्ये पहिला पक्षांतर सोहळा झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटणार हे निश्चित होते. अवघ्या महिनाभराच्या आत १२ नोव्हेंबर रोजी आ.सईद खान यांचे विश्वासू समजले जाणारे नगरसेवक हसीब खान व नगरसेविका आलम तरन्नुम बेगम मुजीब यांनी नगर परिषद सदस्य पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

pathri news, pathri political news, rajesh vitekar, saeed khan

Congress to Shivsena : पतींचे पक्षांतर नगरसेविका म्हणतात मी काँग्रेसमध्येच

सोमवार,दि.१६ रोजी अतिशय रंजक घडामोडी झाल्या. स्वीकृत सदस्य मोईज अन्सारी व काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्र. दहा मधील नगरसेविका मंगल राजेश पाटील यांचे पती राजेश पाटील यांनी आमदार सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे नगरसेविका मानागल पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पष्ट केले की, मी कॉंग्रेस पक्षातच आहे. माझे पती मित्रांसोबत गेले आहेत. यामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. दुष्काळ, साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासारखे प्रश्न समोर असताना राजकीय संघर्षाच्या चौथ्या अंकात काय बघायला मिळणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

https://prasadshivajijoshi.in/pathri-councillor-remains-loyal-to-congress-despite-spouses-party-switch/


Related Posts

Social Media Threat : शेख तो झांकी है…

Social Media Threat: कोणी शेख नावाच्या व्यक्तीने फेसबुक वर बनावट…

Nov 12, 2026

Chhatrapati Shivaji Maharaj Mavla : शिवबांचा मावळा

Chhatrapati Shivaji Maharaj Mavla : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्ष…

Oct 16, 2026

Abhijeet dipke Interview: टॅलेंट असं काही नसतं ?

Abhijeet dipke Interview : देशातील विरोधी पक्षांचा लाडका असलेला अभिजीत…

Oct 14, 2026

Marathwada Graduate Constituency : मराठवाड्यात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने

Aurangabad Graduate Constituency Election 2026 : औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीत…

Oct 9, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *