Pandharpur Wari : दै.लोकमत

Pandharpur Wari in Maharashtra : महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या पंढरपूरच्या वारी या विषयावर दै.लोकमत च्या संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला लेख.

दि. ०९ जुलै २०१४

Pandharpur Wari

महाराष्ट्र हा शब्द उच्चारला की, डोळ्यांसमोर गणेशोत्सव व पंढरपूरच्या वारीचे Pandharpur Wari चित्र उभे राहते. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे अभिन्न अंग आहे व त्याचे मुख्य सूत्र वारी हे आहे. सीगल या समुद्रपक्ष्याची कथा आपल्यापैकी  बहुतेकांना ज्ञात असेल. हा समुद्रपक्षी केवळ अन्नाच्या शोधार्थ न भटकता उंच भरारी घेण्याची कला अत्यंत कष्टाने शिकतो व त्या अगम्य प्रदेशात विहार करतो, परंतु इतर समुद्रपक्ष्यांना ही कला यावी याकरता तो परत आपल्या मूळ ठिकाणी येतो व त्यांना ही कला शिकवू लागतो. अर्थातच, त्याला त्याला प्रवाहाच्या विरुद्ध जावे लागते; परंतु अत्यंत निष्ठेने तो हे काम करत राहतो. वारकरी संप्रदायात  होऊन गेलेले संत हे खर्‍या अर्थाने सीगलच आहेत. ज्यांनी यातना सहन करून सामान्य जनांच्या जीवनात दिव्यत्व येण्यासाठी आयुष्य वेचले. या संतांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती करून एका विलक्षण जगाची ओळख त्यांना करून दिली व प्रपंचात राहून आयुष्याचे र्मम समजून घेण्यासाठी  जीवन जगण्याची कला शिकवली.      


Related Posts

Election Reforms: दै. महाराष्ट्र टाईम्स

Election reforms : पारदर्शी निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा आत्मा आहे.…

ऑगस्ट 26, 2026

Smart Village : दै.एग्रोवन

Smart Village : शहरे स्मार्ट होत आहेत, मात्र त्यासोबतच खेड्यांचाही…

ऑगस्ट 26, 2026

Democracy in India : दै.नागपूर तरुण भारत

Democracy in India : दै.नागपूर तरुण भारत मध्ये लोकशाही विषयावर…

ऑगस्ट 26, 2026

Freedom of Expression: दै. दिव्य मराठी

Freedom of Expression: अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर दै.दिव्य मराठी मध्ये…

ऑगस्ट 26, 2026

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत