वरील ऒळ वाचून कदाचित आपल्याल्या वाटॆल की. हा काय प्रश्न आहे. भारत प्रजासत्ताक आहेच की. पण आपण स्वत:ची फसवणूक न करता वास्तव पाहिले तर अत्यंत भयावह परिस्थिती आपल्याला जाणवेल. भारत प्रजासत्ताक फक्त नावालाच उरलाय. इथे फक्त सत्त्ता आहे ती सत्तापिपासू राजकारण्यांची,माफियांची, सरकारी बाबू लोकांची, स्वत:च्या फायद्यासाठी देशहिताला तिलांजली देणारया व्यावसायिकांची.
ज्या प्रजेची सत्ता आहे असे भासवले जाते, तिला याचा काहीही मागमूस नाही.प्रजेचा पैसा लूटला जाऊन त्यांच्या रोजीरोटिवरच घाव घातला जातॊ. वाढत्या महागाईने जनता मे महिन्यातील उन्हाळ्यासारखी पोळते आहे.देशाचे कृषिमंत्री म्हणतात की महागाई नाहीच. किंवा असेलच तर त्याला मी एकटा जबाबदार नाही. ज्यावेळेस कर्जमाफी झाली त्यावेळेस त्यांनी असे विधान का केले नाही.कर्जमाफीचे सगळे श्रेय त्यांनी स्वत:च घेतले.आश्चर्य वाटावे की आपल्याला ६० वर्षानंतरही शेतीमालालासंदर्भात शेतकरयांना फायदा होईल अशी भ्रष्टाचारविरहित व्यवस्था निर्माण करता आलेली नाही. दररोज कुठे ना कुठे तरी शेतकरी आत्महत्या करतच असतॊ.एवढ्या आत्महत्या होत असताना पून्हा वर तोंड करून भारत हा कृषीप्रधान देश आहे असे म्हणताना यांना काहीच कसे वाटत नाही.
शिक्षण हे तर फक्त उच्चभ्रू लोकांनी उच्चभ्रू लोकांसाठी आपल्या मुलां–मुलींना मौजमजा करण्याचे ठिकाण बनवले आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस नविन धोरण बनवले जाते.दुर्दैव हे की हे ठरवत असताना त्यात शिक्षण तत्द्नयांचा फारच कमी सहभाग असतॊ.कारण खरा शिक्षण तद्न एवढे तकलादू धोरण नाही करणार की ज्याला एका वर्शातच बदलावे लागेल.मग ते प्रवेश प्रक्रिया असो की अन्य काही. कौशल्यांवर आधारित शिक्षण न बनवता आपण इंग्रजांनी दिलेल्या पध्दतीचा आंधळेपणाने अनुनय करतो आहोत.
सार्वत्रिकिकरण की गुणवत्ता याच द्विधा मनस्थितीत आपण आहोत.
आपल्या देशात भरपूर कायदे आहेत.परंतू त्यांचे पालन होत नाही, कारण कायद्याचा धाकच वाटत नाही.सामान्य प्रजेला सर्व जण सर्व बाजूने लूटतात मग ते सरकारी असो किंवा माफिया असोत.परंतू त्याविरुध्द तक्रार करण्याची हिम्मत कोणातच नसते कारण त्यांचा अनुभव त्यांना सांगतॊ की, काहीही होणार नाही आपल्यावरील अन्याय फक्त सहन करायचा याला आपली न्यायव्यवस्थाही अपवाद नाही. कारण ती सध्या अत्यंत क्लिष्ट तर बनलीच आहे शिवाय भरपूर वेळखाऊ व खिशाला परवडणारी नाही आणि दुर्दैव म्हणजे एवढे करुनही न्यायाची खात्री नाही. कुठली सत्ता आणि कोणती प्रजा.बाह्य व अंतर्गत सुरक्षेचेही तसेच गुन्हा सिध्द झाल्यावरही शिक्षा का होत नाही ?
या अशा वातावतरणात सामान्य प्रजेचे स्थान काय ? भ्रष्टाचारी राजकारण्यांना खरेच शिक्षा होईल का ? गरिबांच्या पाल्यांना उच्च शिक्षण मिळेल का ? प्रजेची लूट थांबेल का ? शेतकरी सुखी होईल का ?
म्हणून मला वाटते की हे सारे प्रश्न अनुत्तरित किंवा नकारार्थी असताना भारत प्रजासत्ताक देश कसा ?
