Maratha Reservation: या माणसाने मराठा समाजासाठी काहीच केले नाही का ?

Maratha Reservation Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.विशेषतः मराठा समाजाचे आरक्षण, युवकांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असतानाही त्यांच्यावर मराठा समाजाचे शत्रू असल्याचा आरोप होतो.

राज्याचे नेतृत्व करत असताना आरोप होणे ही काही नवीन बाब नाही. ते होतच असतात. परंतु वाईट याचे वाटते की, एखाद्या समाजाच्या उत्थानासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करत असतानाही त्या नेत्याला सरळ शत्रू म्हणून ठरवले जाते. असा हा नेता म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सद्यस्थितीत राज्यातील सर्वात शक्तिशाली नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. ज्या उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची साथ सोडली त्यांचा पक्ष प्रभावहीन झाला आहे. अशीच स्थिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आहे. विरोधाभास म्हणजे आजच्या काळातील सर्वात जास्त शिव्या खाणारा माणूस म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचेच नाव समोर येते. त्याना सातत्याने शिवीगाळ करून मराठा समाजाचा शत्रू ठरवले जात आहे. हे अर्थातच दुर्दैवी आहे.

Maratha Samaj : राज्यातील मराठा समाजाची स्थिती

राज्यातील बहुतांश मराठा समाज हा गाव खेड्यात राहतो आणि त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. परंतु शासकीय धोरणे, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेती व्यवसाय आर्थिक नुकसानीचा झाला. खुल्या प्रवर्गात असल्याने पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी लागणारी फीस, मुलींच्या विवाहाचा खर्च यासाठी अपरिहार्यतेने बँका किंवा खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन गरजा पूर्ण केल्या जाऊ लागल्या. घटत जाणारे उत्पन्न आणि वाढते कर्ज यामुळे हजारो शेतकरी आत्महत्या कडे वळाले. अशा स्थितीत मराठा समाजातील युवा वर्गामध्ये व्यवस्थेविषयी चीड उत्पन्न होणे अगदीच साहजिक आहे. वर्षानुवर्षे जो राग मनात धुमसत होता त्याला मराठा आरक्षण आंदोलनाने वाट मोकळी करून दिली. आपल्याला वर्गमित्रापेक्षा अधिकची लागणारी फीस आणि जास्त गुण मिळूनही नाकारली जाणारी संधी यामुळे आरक्षणाचे आकर्षण प्रभावी ठरले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरची लढाई सुरु झाली. आणि जस की, प्रत्येक चित्रपटात नायक असतो आणि खलनायकही असतो त्याप्रमाणे मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रारंभीपासून देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरवले गेले. अर्थात यामध्ये राजकीय विरोधकांनीही हात धुवून घेतले. परंतु खरच देवेंद्र फडणवीस हा माणूस मराठा समाजाचा शत्रू आहे का ? या माणसाने मराठा आरक्षण आणि समाजासाठी आजपर्यंत काहीच केले नाही का ? फडणवीस या व्यक्तीने मराठा समाजासाठी नेमके काय केले ते बघुया अर्थात अधिकृत माहिती आणि आकडेवारीसह.

Maratha reservation and Devendra Fadanvis

Maratha Reservation Protest : मराठा समाज आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस सरकार

Devendra Fadanvis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मराठा आरक्षणासाठी झालेले प्रयत्न

Maratha reservation timeline

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

मराठा समाजातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी कर्ज मिळण्याची सुविधा तसेच कौशल्य विकास करण्यासाठी प्रयत्न.

annasaheb patil aarthik vikas mahamandal

सारथी

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळावे यासाठी शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षणाची सुविधा या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांचे शासकीय नौकरीचे स्वप्न पूर्ण झाले.

Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute SARTHI Pune

मराठा समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यासाठी कर्ज मिळावे, स्पर्धा परीक्षेत यश मिळावे यासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करून दाखवणारा माणूस मराठा समाजाचा शत्रू कसा असू शकतो ?


Related Posts

Semiconductor Chip Manufacturing : भारतात Semiconductor Chip निर्मितीला सुरुवात; जाणून घ्या भारताला होणारे 7 मोठे फायदे

Semiconductor Chip Manufacturing : भारतामध्ये Semiconductor Chip उत्पादनाला सुरुवात झाली…

सप्टेंबर 19, 2026

Maharashtra Govt GR : निर्णय होतात; पण अंमलबजावणीचाच खरा प्रश्न!

Maharashtra Govt GR : महाराष्ट्र शासनाने शासकीय फाईल सात दिवसांत…

सप्टेंबर 17, 2026

Rohit Pawar : रोहित पवारांचा सेल्फगोल

Rohit Pawar News सत्ताधारी पक्षाच्या धोरणाविरुद्ध विरोधकांनी जनतेत जागृती केलीच…

ऑगस्ट 4, 2025

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत