राहुल गांधींची पॅव्हेलियन मधील कॉमेंट्री
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकी संदर्भात लिहिलेला लेख देशातील अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करणारा लेख वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध करणे हे लोकशाही केवळ जीवंतच नाही तर अतिशय धडधाकट असल्याचा पुरावा आहे. त्याबद्दल समस्त लोकशाहीप्रेमींचे मनापासून अभिनंदन. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात मोठा घोळ झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी…