Author: Prasad Shivaji Joshi

Content Writer, Political Reporter, Freelance Journalist. Completed MJ and MA in Political Science. Having 15+ experience in Print, Digital Media. Social Activist
  • राजकीय नेतृत्व : दुष्काळ विकासाच्या इच्छाशक्तीचा

    भारतीय संसदेला ६० वर्षे पूर्ण झाली. संसद सदस्यांनी आपण ६० वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन बलस्थाने अधिक मजबूत करणे तर अडचणींवर उपाय शोधणे अपेक्षित होते. पण संसदेत उत्सव होण्यापलीकडे काहीच झाले नाही. संसद आणि गोंधळ हे समानार्थी शब्द झाले आहेत. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रातले तज्ञ असताना ६० वर्षानंतरही समस्या आहे तशाच आहेत किंबहुना त्यात काही अंशी वाढच झाली आहे.कुठलेही क्षेत्र…

  • Teachers : शासकीय कर्मचारी नको; गुरुजी पाहिजेत

    Teachers need for nation building : असे म्हणतात कि, शिक्षकाच्या एका पायात विकास तर दुसऱ्या पायात विनाश असतो. म्हणजेच एका शिक्षकाने ठरवले तर राष्ट्रनिर्माण होऊ शकते आणि शिक्षक बिघडला तर विनाश होण्यासही काही वेळ लागत नाही.सध्या तरी शिक्षक,प्राध्यापक वर्ग वेगाने आपला दुसरा पाय पुढे टाकत आहे. याचा दाखला देणारी घटना नुकतीच औरंगाबाद शहरात घडली.दोन शिक्षकात हाणामारी होऊन त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला.हि एकच घटना नाही तर महाविद्यालय परिसरात मारहाण, प्राथमिक शाळेत लैंगिक शोषण अशा अनेक घटनांनी राज्यातील शिक्षण क्षेत्र हादरवून जात आहे.

  • बिन पैशाचा तमाशा

    महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल काही नवीन नाही. हा बिन पैशाचा तमाशा हा महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे पाहत आहे. आपली अडचण झाली म्हणजे पक्षापेक्षा स्वत:च्या मनाप्रमाणे झाले नाही कि घुसमट, अन्याय इ. शब्द वापरून पक्षबदल करायचा धंदा बिन बोभाटपणे चालू आहे. राज्यात नुकतेच भाजपचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या भावाने बंड केले.भाजपचे आ.प्रकाश शेंडगे पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत.रा.कौ. चे ठाण्यातील आमदार…

  • वैचारिक दरिद्र्यरेषा

    दरिद्ररेशा आत फक्त आर्थिकच नसून वैचारिक पण असू शकते हे आता ठळकपने जाणवू लागले आहे. आन्ना हजारेंच्या लोकपाल आन्दोलनाबाबत तर या दरिद्र्यरेश्याची यादीच स्पष्ट झाली. पुढील मुद्दे वाचून आपल्याही हे लक्षात येइलच…. लोकशाही धोक्यात आल्याचा कांगावा लोकपाल आला म्हणजे जणू कही हिटलरच येणार आणि समस्त कोंग्रेस वासिय ज्यू लोकांची सरसकट हत्या करणार असाच कांगावा केला…

  • मतदारां (राजा)नो राष्ट्रधर्म पाळा

    आपल्या देशात सण– उत्सवानंतर निवडणुकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो.वास्तविक हा उत्साह मतदारात हवा,परंतु तो केवळ राजकीय नेते व कार्यकर्त्यांमध्येच  दिसून येतो.याच दरम्यान पक्ष निष्ठेची खरी परीक्षा होते.परीक्षा कसली सरळ सरळ वस्त्र हरणाच म्हणा ना. स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत तत्कालीन राज्यकर्त्यांना देशाला एक प्रगल्भ लोकशाही देता आली असती. आदर्श लोकप्रतिनिधी कसे असावेत याचा एक वस्तुपाठ त्यांना निर्माण…

  • Ideal teachers: शिक्षक या पदाचे वाढते अवमूल्यन

    Ideal teachers quality : सृष्टीची निर्मिती झाल्यापासून संबंध मानवजातीत माणूसपण आणण्यासाठी , ज्ञान देऊन प्रगल्भ करण्यासाठी गुरु, शिक्षक हि संस्था ज्ञानदान करत आलेली होती .त्यासाठी आवश्यक अभ्यास ,चिंतन करून इतरांना ज्ञान देण्यासाठी कष्ट करण्याची समर्पित वृत्ती असणारे ते एक चालते बोलते विद्यापीठ होते. बोले तैसा चाले याचा एक आदर्श वस्तुपाठ होते. मानवाच्या प्रगतीसाठी संशोधन करून विविध शास्त्रांचा विकास व्हावा हा निर्मळ हेतू त्यामागे होता. नैतिक मुल्यांची जपणूक तर त्यांच्या जगण्याचे मुलभूत अधिष्ठान होते. त्यामुळे समाजातील नैतिक व सांस्कृतिक वातावरनाचे नेतृत्व शिक्षकांकडे होते. थोडक्यात काय तर त्यागी वृत्तीचा शिक्षक, प्राध्यापक हा सृजनशील समाज निर्मितीचा पाया होता.

  • मी लोकशाही बोलतेय

    नमस्कार अशक्त का असेना तुम्हाला बोलण्याइतपत माझ्यात शक्ती थोडी शिल्लक आहे.ज्या देशात माझा गौरव झाला, ज्या देशाचा मला अभिमान वाटायचा आणि त्याचा देशात माझ्याच रखवालदारांनी माझा गळा घोटण्याचे काम केले आहे अशी मी लोकशाही बोलतेय …….. माझे वर्णन करताना असे म्हणतात कि , लोकांनी, लोकांच्यासाठी आणि लोकांकरिता अशी केली होती परंतु भ्रष्ट नेत्यांनी त्यात बदल…

  • पैसा झाला खोटा

    अस म्हणतात कि भारत देश गरीब आहे भारतीय नाहीत. कारण स्वीस बँकेत काळा पैसा जमा करणारे जास्तीत जास्त भारतीयच आहेत. देशात महागाई एखाद्या अजगरासारखी सामान्य नागरिकाला घट्ट आवळून बसली आहे. वारंवार प्रयत्न करूनही सरकारला त्यावर नियंत्रण आणता येत नाहीये. त्यातच भर म्हणून कि काय रोज नवीन घोटाळे उघडकीस येत आहेत.केंद्र सरकारला विकासाची पाउले उचलण्या ऐवजी बचावात्मक पवित्राच घ्यावा लागतोय. कॉंग्रेसच्या…

  • भारत पुन्हा प्रजासत्ताक केव्हा होईल ?

    वरील ऒळ वाचून कदाचित आपल्याल्या वाटॆल की. हा काय प्रश्न आहे. भारत प्रजासत्ताक आहेच की. पण आपण स्वत:ची फसवणूक न करता वास्तव पाहिले तर अत्यंत भयावह परिस्थिती आपल्याला जाणवेल. भारत प्रजासत्ताक फक्त नावालाच उरलाय. इथे फक्त सत्त्ता आहे ती सत्तापिपासू राजकारण्यांची,माफियांची, सरकारी बाबू लोकांची, स्वत:च्या फायद्यासाठी देशहिताला तिलांजली देणारया व्यावसायिकांची. ज्या प्रजेची सत्ता आहे असे…