Rampal Story: अधर्माचा धार्मिक देखावा
Rampal Story: अनादिकाळापासून मानवसमुह धर्मभावनेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने जोडला गेलेला आहे. समाजमनावर धर्मसत्तेचा मोठा प्रभाव होता किबहुना आजही आहे. नैतिक -अनैतिक संकल्पना, सृष्टीची उत्पत्ती, कार्यकारण भाव, कर्म त्याचा परिणाम या सर्वांची चर्चा,ज्ञान तत्वांच्या द्वारे धर्माच्या माध्यमातून समाजमनावर मांडली जाते.व्यक्तीची जाणीव विस्तारली जावी, त्याला आपल्या अस्तित्वाचे कारण उमजावे व जीवनध्येय साध्य करण्याचा मार्ग सापडला जावा ज्यामुळे त्याचे आचरण आदर्श होऊ शकेल याकरिता धर्माचे निमित्त आहे. साधारणपणे असे म्हणता येईल की, धर्म म्हणजे आदर्श आचारसंहिता अथवा अशी तत्वे ज्यामध्ये सर्व जीवांचे कल्याण सामावले आहे. परंतु भारतीय समाजमनावर प्रबळ असलेल्या धार्मिक भावनेचा अनेक जण दुरुपयोग करताना दिसत आहेत.