Author: Prasad Shivaji Joshi

Content Writer, Political Reporter, Freelance Journalist. Completed MJ and MA in Political Science. Having 15+ experience in Print, Digital Media. Social Activist
  • प्रज्ञासूर्याची किरणे

    प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख–दुःखाचे,मान–सन्मानाचे  प्रसंग येत असतात. आपल्या व्यक्तीमत्वाची परीक्षा  ख–या अर्थाने प्रतिकूल परिस्थितीत होत असते. बहुतेक जन परिस्थितीला दोष देऊन प्रवाहात सामील होतात. काहीजण परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नास सुरुवात करतात मात्र काही कठीण प्रसंगी धीर खचून हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून देतात. मात्र इतिहास असेच व्यक्ती घडवतात की जे कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्याचा धैर्याने सामना करत परिस्थितीत अनुकूल बदल घडवून…

  • आम्हीही त्याच गावचे

    संपूर्ण स्वराज अशी आरोळी देणा-या आंदोलकांनी पारंपारिक आम आदमी च्या नावाने राजकीय पक्ष स्थापन केला. प्रामाणिकपणा, भ्रष्टाचाराविषयी पोटतिडकीने विरोध या मुद्द्यांच्या आधारे राजकारणाला वैतागलेल्या सामान्य जनतेच्या अंतर्मनाचा ठाव घेत नवा पर्याय देत असल्याचा दावा केला. परंतु सध्या ज्या काही घटना घडत आहेत त्यावरून आम आदमी पक्ष हा सुद्धा इतर राजकीय पक्षांसारखाच आहे व स्वत: केजरीवाल…

  • तारांकित कलंक

    सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना नियम सर्वांसाठीच असतात  असे आपण दिमाखात सांगत असलो तरीही  दुर्दैवाने आपल्या देशात नियम लागू आहेत की नाही हे त्या व्यक्तीच्या आर्थिक संपत्ती  वरून ठरते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समाजात वावरताना नियम पाळायचे नसतील तर त्याने सर्वात प्रथम स्वत:चा    आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. विशेष म्हणजे हे करताना कुठलेही नीतीनियम पाळण्याची आवश्यकता नाही. आर्थिक…

  • सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भयगंड

    समाजात  घडणा-या विविध घटनांचे विश्लेषण प्रत्येक जन आपल्या पध्दतीने करत असतो. लोककल्याणाचे ध्येय समोर ठेवून त्यासंबंधी चिकित्सा करून काही निष्कर्ष मांडणारे विविध विचारप्रवाह कालौघात निर्माण झाले. या प्रत्येक विचारप्रवाहात  विकासाच्या स्वत:च्या अशा व्याख्या आहेत. परस्पर विरोधी विचारप्रवाहांच्या मुद्द्यांना तर्काच्या आधारे खोडून काढणारी  अथवा प्रामाणिकपणे त्यांना तपासून त्यातील कच्चे दुवे समाजासमोर मांडणारी  प्रगल्भ वैचारिक परंपरा भारतात प्रसिद्ध आहे. परंतु ही  परंपरा लोप…

  • राजे आम्हाला माफ करा ….

    आम्हाला याची पुर्ण खात्री आहे की, हे शब्द आपल्याला आवडणार नाहीत; परंतु तरीही आपल्यासमोर उभे राहिल्या नंतर खोटे  बोलता येत नाही. रायगडावर चढताना प्रत्येक पाउलावर आपल्या अतुल्य शौर्याची,सामर्थ्याची जाणीव होत होती. कानामध्ये वीर रसाची स्फुर्तीगीते ऐकू येत होती. आपल्या शौर्याची जीवंत साक्षीदार असलेली,  आपल्या पदस्पर्शाने पावन झालेली मातीतून एक वेगळाच दिव्य स्पर्श जाणवत होता.डोळ्यासमोर पराक्रमी…

  • विकृत मनोरंजन

    स्वातंत्र्य व त्यासोबतच्या असणा-या जबाबदारीच्या संदर्भात मागील लेखातच चर्चा झाली होती. त्यात असेही नमूद केले होते की, स्वातंत्र्याला विवेकाचा आधार नसेल तर त्याचे विकृती बनते. याची प्रचीती यावी अशी घटना नुकतीच घडली. एआयबी रोष्ट अशा नावाच्या शो मध्ये सार्वजनिक सारासार विवेकाचे धिंडवडे निघाले. समाजाच्या एका वर्गात  पेज थ्री संस्कृती प्रचलित आहे. त्याचेच सवंग व किळसवाणे प्रदर्शन…

  • मुसद्दीलाल ची व्यथा संपेल का ?

    सब टी.व्ही.वर ऑफीस- ऑफीस नावाची मालिका खूप लोकप्रिय झाली होती. त्यातील मुसद्दीलाल हे पात्र सर्वसामान्य मध्यमवर्गीयाचा प्रतिनिधीत्व करणारे होते. शासकीय कार्यालयात काम करताना एका सामान्य नागरिकाला ज्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागते त्याचे यथार्थ चित्रण या मालिकेत होते. त्यातील विनोदाचा भाग सोडला तर मुसद्दीलाल चे जगणे ब-याच अंशी प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला येतेच. कुठलेही काम वेळेवर न…

  • स्वातंत्र्याची जबाबदारी

    अपरिपक्व अवस्थेत फार मोठी जबाबदारी मिळाली की त्यातून फार काही विधायक,आदर्श वर्तन घडताना दिसत नाही. आपल्या देशातील नागरिकांचे एकूण वर्तन व राष्ट्रीय चरित्र पाहिले की याची प्रकर्षाने जाणीव होते. भारताच्या स्वातंत्र्याचेही असेच झाले आहेत. स्वातंत्र्याचे मोल समजले नाहीकी, बेजबाबदारपणाचे वारू चौफेर उधळू लागतात. स्वातंत्र्याला विवेकाचे अधिष्ठान नसेल तर त्याचे रुपांतर विकृती मध्ये होते. अशा अविवेकी स्वातंत्र्याने…

  • सामाजिक बदलासाठी युवामित्र

    लोककल्याणाच्या हेतूने शासनस्तरावर होणारे निर्णय व योजना यांचे अमलबजावनीच्या पातळीवरील   अपयश हे एकूणच सुशासनाच्या मार्गातील मोठाच अडसर आहे. स्थानिक पातळीवर अमलबजावनी प्रभावीपणे होत नाही याचे कारण लाभार्थ्यांना योजनांची,निर्णयाची तपशीलवार माहिती नसणे हे आहे. हीच परिस्थिती युवकांच्या बाबतीतही आहे. केंद्रीय युवक कल्याण मंत्रालय व राज्य शासनाच्या खात्यामार्फत युवकांसाठी विविध योजना राबवल्या जातात.युवकांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य व अन्य प्रकारचे…

  • वसा विवेकानंदांचा

    भारतभूमी ही वीरप्रसवा आहे. आजपर्यंत या भूमीत अनेक वीरांनी जन्म घेतला.केवळ भारतालाच नव्हे तर समस्त जगाला आपल्या ज्ञान प्रतिभेने, अतुल्य कर्तृत्वाने आकर्षित केले. समाजजीवनाचा अभिन्न भाग असलेल्या कला,साहित्य,क्रीडा,समाजकार्य,अधात्म,व्यापार-उद्योग   अशा सर्वच क्षेत्रातील सर्वोच्च ठिकाणी स्थान प्राप्त केले. अशा भारतभूमीत पश्चिम बंगाल मध्ये जन्म घेतलेल्या एका नरेंद्र नावाच्या मुलाने भारत भूमीला पावन केले. किशोरवयात असतानाच स्वत:मधील अचाट बुद्धीमत्तेचे,एकाग्रतेचे दर्शन…