सामाजिक

  • प्रतिक्षा सुराज्याची…

    प्रतीक्षा सुराज्याची… कुरतडून गेलेली अर्थव्यवस्था,शेतक-यांच्या आत्महत्या, कायदा व सु-व्यवस्थेचे वारंवार निर्माण होणारे प्रश्न,धोरणांची अनागोंदी या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाले. नवे सरकार आल्याने साहजिकच परिस्थिती बदलेल अशी सार्वत्रिक अपेक्षा आहे.अर्थात जादूची छडी कोणाकडेच नसल्याने लगेचच मोठे बदल होतील अशी भाबडी आशा नाही,परंतु तरीही कार्यपध्दती व दिशा याबाबतीत स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे. याचे…

  • ग्रामोदयाचा प्रारंभ

    सध्याच्या व्यवस्थेत लोकप्रतिनिधी हेच विकासाचे प्रमुख सूत्रधार आहेत.म्हणजे लोकहिताचे एखादे कार्य कोणी सामाजिक कार्यकर्त्याने हाती घेतले तर त्याला त्याच्या कार्यात यश मिळवण्यासाठी मोठा लढा द्यावा लागतो, परंतु तेच कार्य एखाद्या लोकप्रतिनिधी अथवा राजकीय नेत्याने हाती घेतले तर लोकभावना लगेच तयार होते व सर्व यंत्रणा कामाला लागते हे आपण पाहत आलो आहोत. थोडक्यात असे म्हणता येईल…

  • पोलीस राष्ट्रसाधनेचा कुपोषित साधक

    निवडणुका, सार्वजनिक उत्सव, सभा, संमेलने, आंदोलन या सर्व सामाजिक घडामोडींचा पोलीस कर्मचारी हा साक्षीदार असतो. ज्यांच्या अस्तित्वाने आपण सार्वजनिक ठिकाणी व आपल्या घरातही निर्धास्त होतो ती व्यक्ती म्हणजे पोलीस. ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो. गुन्हेगारास कायद्याच्या धाक निर्माण करणारा पोलीस म्हणजे लोकशाही मूल्ये जपणारा जागता प्रहरी. सर्वसामान्यांचे जगणे सुलभ व्हावे यासाठी स्वत: कष्टमय जीवन…

  • श्रीगणेशाचे कार्यकर्त्याना पत्र

                            श्रीगणेशाचे कार्यकर्त्याना पत्र प्रतिवर्षी  माझ्या आगमनाची आतुरतेने प्रतीक्षा करणारया तमाम कार्यकर्त्यानो …। अत्यंत आपुलकीने दरवर्षी तुम्ही चातकाप्रमाणे माझ्या आगमनाची प्रतिक्षा करता. उत्साहात स्वागत करता. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला दिलेले सार्वजनिक स्वरूप मलाही अत्यंत भावले. तुमच्या हृदयात तर मला कायमचे स्थान आहे, परंतु या दहा…

  • वास्तवातील ‘ हीरो’

    मुंबईतील लोटस बिझनेस पार्क या इमारतीला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर हे शहीद झाले.अशा घटनांमधून आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातील दोष प्रकर्षाने सामोरे येतात. त्यातही आपत्तीपूर्व दक्षता घेण्याबद्दल आपण अक्षम्य दुर्लक्ष करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्यानंतर, ती कोसळल्यानंतर सुरक्षेचे परीक्षण केलेच नसल्याचे पुढे येते. परिणामी नितीन यांच्या सारख्या जवानांना…

  • ध्यास नवनिर्मितीचा

    सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये नवनिर्मिती हा एक समान गुणधर्म आढळतो. नवनिर्माणाकडे असलेली  ओढ याची साक्ष देते. जगण्याचा लढा  देत, अनंत अडचणींचा सामना करत जगणे फ़ुलवणे ही नवनिर्मितीची अविकसित शक्तीच होय. अर्थात  केवळ जगणे म्हणजेच काही नवनिर्मिती नव्हे, तर आपल्या अस्तित्वाला एक वेगळा अर्थ निर्माण करणे. स्वत :च्या कोशात न रमता इतरांच्या आयुष्यातील दुख वेदना…

  • सदरक्षणाय की खलरक्षणाय ?

    पोलीस प्रशासन हा शासन व्यवस्थेचा कणा समजला जातो. एकवेळ प्रशासकीय व्यवस्था विस्कळीत असेल तर त्याच्या जो काही अनुचित परिणाम समाजावरती होईल त्याच्या दुपटीने जास्त वाईट परिणाम पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्यास होऊ शकतो. कारण समाजातील प्रत्येक व्यक्ती निर्भय असतात व गुन्हेगारांना ज्यांची धास्ती असते असे ज्यांचे अस्तित्व आहे त्या पोलीस यंत्रणेला राजकीय व्यक्तींनी स्वत:च्या फायद्यासाठी पोखरून…

  • प्रयत्न उमेद जागवण्यासाठी

    हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने गलितगात्र झालेले गावातील शेतकरी आम्हाला गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती देत होते. इतक्यात तेथे एक टेम्पो येऊन थांबला आणि एक शेतकरी काहीशा घाईत निघू लागले. आम्ही त्याना विचारले तर त्यांचे उत्तर गारपिटीने झालेल्या नुकसानीची भीषणता स्पष्ट करणारे होते. त्यांनी सांगितले “गारपिटीने सगळा माल नष्ट केला. आम्ही कसेही जगू . बैलांना काय…

  • लिमीटेड प्रेम

      प्रेम असाव दिव्यासारख स्वत: जळून इतराना प्रकाश देणार कसलीही अपेक्षा न करता आपल्यासाठी राबनारया आईच्या मायेसारख आकर्षण हेच प्रेम समजणा-या व टाईम पास म्हणून एका दिवसापुरता साजरा करणा-या प्रेमवीरांचा दिवस शुक्रवारी आहे. सध्याचा काळ नौटंकी करणाऱ्यांचा असल्याने प्रेमासारख्या उत्कट भावनाही फेशनच्या बाजारात कवडीमोल ठरत आहे.आपले जगणे कृत्रिम होत जात असल्याचे हे महत्वाचे निदर्शक आहे….

  • सर्व प्रश्नाचे मूळ : आर्थिक विषमता

    भारतीय समाजात अथवा या देशात बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्था नसती तर कदाचित आज आपण ज्या प्रगत अवस्थेत आहोत त्याच्या कितीतरी पटीने अधिक प्रगत असतो. माणुसकीला मुठमाती देऊन उच्चवर्णीय दलित समाजाचे शोषण करता होता.धर्माचा मूळ गाभा व्यावहारिक हिताने झाकून गेला.‘वसुधैव कुटुंबकम’, सर्वेपि सुखिन: संतु  असे केवळ व्यक्तिगत स्वार्थापायी उच्चारले जाऊ लागले. प्रत्यक्ष व्यवहार मात्र याच्या अगदी विरुद्ध…