सामाजिक

  • गिधाडानो आणखी किती लचके तोडाल ?

    प्रत्येक प्राणीमात्राला पोटाची आग शमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निसर्गाची अन्नसाखळी कार्यरत असते. काही प्राण्यांना जीवंत राहण्यासाठी इतर प्राण्यांच्या हाड-मासावर अवलंबून रहावे लागते. जसे की, गिधाडे. ही गिधाडे प्राण्यांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. अनेकवेळा ही गिधाडे मेलेल्या किंवा अर्धमेलेल्या प्राण्याच्या शरीराचे लचके तोडण्यासही धजावतात. त्याच्या या कृतीबद्दल गिधाडांना कणमात्रही दोष देता कामा नये, कारण ती…

  • प्रगल्भ लोकशाहीसाठी नागरिकशास्त्राची आवश्यकता

                                                          ( छायाचित्र सौजन्य : इंटरनेट ) पैसे देऊन मतदान विकत घेणे व मतदारांनीही पैसे घेऊन मत विकणे, नेत्यांनी आपल्या भाषणात दोनदा मतदान करा जाहीर, वीजबील, कुठल्याही प्रकारचा कर…

  • बलात्काऱ्याना फाशीच हवी; पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे केव्हा बंद होणार ?

    असिफा च्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कोणाही संवेदना जाग्या असलेल्या व्यक्तीचा थरकाप उडवणारी ही घटना आहे. म्हणून यात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. मात्र यानिमित्ताने तिच्या दुर्दैवाचे भांडवल करून राजकारणाचा, धार्मिक विद्वेषाचा व्यवसाय मात्र जोरात चालला.                          …

  • जबाबदारी कोणाची ?

    व्यक्तिगत जीवनात, समाजात,राष्ट्रात अथवा जगाच्या पाठीवर कोठेही एखादी बरीवाईट घटना घडली की त्याला जबाबदार कोण याविषयीची कारणमीमांसा सुरु होते. अर्थात ती व्हायलाच हवी. परंतु प्रश्न आहे तो जबाबदारी स्वीकारण्याचा आणि जबाबदारी ढकलण्याचा. समाजातील सर्व नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मुलभूत सोयीसुविधा पुरवणे, सुरक्षेची हमी व सामाजिक व आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले वातावरण उपलब्ध…

  • जबाबदारी कोणाची ?

    व्यक्तिगत जीवनात, समाजात,राष्ट्रात अथवा जगाच्या पाठीवर कोठेही एखादी बरीवाईट घटना घडली की त्याला जबाबदार कोण याविषयीची कारणमीमांसा सुरु होते. अर्थात ती व्हायलाच हवी. परंतु प्रश्न आहे तो जबाबदारी स्वीकारण्याचा आणि जबाबदारी ढकलण्याचा. समाजातील सर्व नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मुलभूत सोयीसुविधा पुरवणे, सुरक्षेची हमी व सामाजिक व आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले वातावरण उपलब्ध…

  • मराठवाड्याला इसीस चा विळखा

    मराठवाडा ही संतांची भूमी. अजूनही येथील जनता प्रचंड सहनशील आहे. म्हणजे रस्ते, वीज व पाणी यासारख्या मुलभूत गरजाही मिळत  नसताना येथील जनता मुकाटपणे सहन करते. येथील रस्ते पहिल्या पावसात वाहून जातात. रस्ते नाहीत म्हणून एस.टी. येत नाही. तरीही येथील नागरिक बघ्याची भूमिका घेतात व विरोधाभास असा की हेच लोक सर्वात जास्त राजकारणावर बोलतात .तर असा…

  • दाहक दुष्काळात संवेदनांचा ओलावा

    राज्यातील व विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळाची भीषण अवस्था दररोज वर्तमानपत्रातून वाचायला मिळत आहे. शेतकरी आत्महत्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या चारयाचा प्रश्न, रोजगारासाठी शहराकडे वाढलेले विस्थापन या व अशा अनेक सामाजिक समस्या या दुष्काळाने निर्माण केल्या आहेत. माणुसकीची परीक्षा पाहण्यासच हा दुष्काळ आला आहे याची खात्री पटते. दुष्काळाने निर्माण केलेल्या संकटाकडे पाहून समाजातील संपन्न वर्गात क्षणभर अस्वस्थता…

  • |

    Happiness Index : आनंदाची क्रमवारी

    Happiness Index : जागतिक पातळीवर वेगवेगळ्या मुद्यांच्या अभ्यासासाठी सर्वेक्षण, पाहणी केली जाते. कधी उत्कृष्ट गुणवत्ता असलेली शैक्षणिक संस्था शोधण्यासाठी तर कधी पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. जगातील सर्वाधिक आनंदी देश शोधण्यासाठी जागतिक पातळीवर नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले. ज्यामध्ये त्या देशातील नागरिकांच्या आनंद व समाधान याबाबतीत पाहणी करून क्रमवारी तयार करण्यात आली. या यादीत भारताचा क्रमांक ११७ वा असल्याचे सांगितले गेले. अर्थात भारतासारख्या बहुरंगी, बहुढंगी व लोकजीवनात पावलापावलावर विविधता आढळणा-या या देशात आनंद व समाधान यासारख्या मानसिक पातळीवरील बाबीसंबंधात काही निवडक लोकांना प्रश्न विचारून संबंध देशाविषयी अनुमान काढणे कितपत व्यवहार्य आहे याबद्दल निश्चितपणे शंका निर्माण होऊ शकतात. खरे पाहता मुळातच या पाहणीचे प्रयोजन फारच गमतीशीर वाटते.

  • तारांकित कलंक

    सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना नियम सर्वांसाठीच असतात  असे आपण दिमाखात सांगत असलो तरीही  दुर्दैवाने आपल्या देशात नियम लागू आहेत की नाही हे त्या व्यक्तीच्या आर्थिक संपत्ती  वरून ठरते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समाजात वावरताना नियम पाळायचे नसतील तर त्याने सर्वात प्रथम स्वत:चा    आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. विशेष म्हणजे हे करताना कुठलेही नीतीनियम पाळण्याची आवश्यकता नाही. आर्थिक…

  • सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भयगंड

    समाजात  घडणा-या विविध घटनांचे विश्लेषण प्रत्येक जन आपल्या पध्दतीने करत असतो. लोककल्याणाचे ध्येय समोर ठेवून त्यासंबंधी चिकित्सा करून काही निष्कर्ष मांडणारे विविध विचारप्रवाह कालौघात निर्माण झाले. या प्रत्येक विचारप्रवाहात  विकासाच्या स्वत:च्या अशा व्याख्या आहेत. परस्पर विरोधी विचारप्रवाहांच्या मुद्द्यांना तर्काच्या आधारे खोडून काढणारी  अथवा प्रामाणिकपणे त्यांना तपासून त्यातील कच्चे दुवे समाजासमोर मांडणारी  प्रगल्भ वैचारिक परंपरा भारतात प्रसिद्ध आहे. परंतु ही  परंपरा लोप…