Political Satire: डिजिटल आणीबाणी आणि धन्नोभौ
Political Satire: (धन्नोभौ आपल्या कार्यालयात येरझाऱ्या घालत असताना आणीबाणी, निषेध अस काहीतरी पुटपुटत असतात ) तेवढ्यात बुवा हातात डायरी घेऊन धा वाजून धा मिनिटाला प्रवेशते झाले. बुवा : साहेब घात झाला, घात झाला. (शांत होण्याचा निर्धार करत असतानाच जोशीबुवांच्या घातवाणी कडे साहेबानी गरकन मान वळवत बघितले) धन्नोभौ : बुवा, अस आभाळ पडल्यासारखे काय ओरडता, (प्र)शांत व्हा….