वारी : स्वान्त सुखाची आनंदयात्रा
जय जय विठ्ठल रुखमाई म्हणत पखवाजावर थाप पडली की मन आपोआप त्या मधुर भजनाकडे आकर्षिले जाते. आपल्याही नकळत भूतकाळातल्या त्रासदायक आठवणीच्या गाठी आणि भविष्यातील चिंतेने म्लान झालेला चेहरा एका विलक्षण तेजाने उजळुन निघतो. असे हे मंगलमय वातावरण दिसले की आषाढी एकादशी आली असे निश्चित्पणे जाणावे. वारकरी आणि पंढरीची वारी हे जणू महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचा श्वासच….