राजकीय

  • आम्ही सारे नतद्रष्ट

    ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे ‘ नवरा मेला तरी हरकत नाही पण सवत विधवा झाली पाहिजे’. सवतीमत्सर हा सर्वज्ञात आहे. परंतू त्याचा अतिरेक झाला की ती स्त्री सवतीच्या द्वेशापायी आपल्या पतीचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. असाच काहीसा प्रकार देशातील कॉंग्रेस पक्षातील काही नेत्यांचा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप चा द्वेष करताना…

  • आम्हीही त्याच गावचे

    संपूर्ण स्वराज अशी आरोळी देणा-या आंदोलकांनी पारंपारिक आम आदमी च्या नावाने राजकीय पक्ष स्थापन केला. प्रामाणिकपणा, भ्रष्टाचाराविषयी पोटतिडकीने विरोध या मुद्द्यांच्या आधारे राजकारणाला वैतागलेल्या सामान्य जनतेच्या अंतर्मनाचा ठाव घेत नवा पर्याय देत असल्याचा दावा केला. परंतु सध्या ज्या काही घटना घडत आहेत त्यावरून आम आदमी पक्ष हा सुद्धा इतर राजकीय पक्षांसारखाच आहे व स्वत: केजरीवाल…

  • विज्ञान बुडाले हो ……

    एकेकाळी असा समज होता की, ‘ शिक्षित अथवा उच्चशिक्षित व्यक्ती हा प्रगल्भ असतो. जीवन जगण्याची सृजनात्मक दृष्टी त्याच्याकडे असते. समाजातील दु:ख, वेदना याविषयी तो संवेदनशील असतो व आपल्या विरोधी मताचाही तो तितकाच आदर करतो.’ दुर्दैवाने हा समज हळूहळू खोटा ठरत आहे. म्हणजे शिक्षित अथवा उच्चशिक्षित व्यक्ती समाजातील दु:ख,वेदना याविषयी संवेदनशील असेलच असे म्हणता येत नाही. तसेच स्वत:स न…

  • लोकशाहीच्या नावान चांगभल

    १५ तारखेला राज्यातील जनतेने आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही शासन व्यवस्थेतील मतदार या घटकाला एक दिवसापुरते का असेना पण मोठेच महत्व असते.  निवडणुकीत नवीन  होते ते उरलीसुरली राजकीय संस्कृती अखेरचा श्वास घेताना बघण्याचे दुर्दैव. या निवडणुकीत किमान सभ्यतेच्या सर्वच मर्यादा  मोडल्या गेल्या. विशेषकरून बोलण्याच्या बाबतीत. निवडणुकीच्या प्रचारात आरोप -प्रत्यारोप हे होतच असतात. हे मान्य केले तरी ज्या काही संवेदनशील बाबी आहेत त्यांच्यासंदर्भात बोलताना…

  • मराठवाड्याचा (मुक्ती) संग्राम आजही चालूच

    १७२४ ते १९४८ असा मोठा काळ निजामशाहीत काढल्यानंतर स्वातंत्र्य उपभोगणारा मराठवाडा हा कुपोशितच राहिला. रझाकारांची फौज सशस्त्र अत्याचार करत होती. अशा परिस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली  अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम आपल्या शौर्याने पावन केला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून  मराठवाडा मुक्त झाल्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी या प्रदेशाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे…

  • ही जबाबदारी सर्वांचीच

    जबाबदारी सर्वांचीच जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणारया आपल्या देशाच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्या जशा राजकीय नेत्यांच्या शिवराळ, अर्वाच्य भाषेने गाजल्या तितक्याच त्या मतदारयादी संदर्भात झालेल्या घोळानेही चर्चेचा विषय झाल्या. निवडणूक आयोगाने  अधिक  लोकाभिमुख  आवश्यक आहे. तसेच वापरण्यात येणारे तंत्रज्ञान हे युजर फ्रेंडली असले पाहिजे. अन्यथा आहे ती पध्दत अधिक क्लिष्ट होण्याचा धोका आहे. या…

  • नेतृत्वासाठी तहानलेला मराठवाडा

    विकास प्रक्रियेत अथवा कुठल्याही चांगल्या बदलाच्या मुळाशी प्रयत्नातील सातत्य आणि ते करणारे नेतृत्व या दोन प्रमुख बाबी कारणीभूत असतात. विकासाचे केंद्र राजकीय इच्छाशक्ती असते हे आपण इतर अनेक उदाहरणावरून बघू शकतो. मराठवाड्याच्या संदर्भात कदाचित या दोन बाबी समांतर चालल्याचे दुर्दैवाने कधी दिसले नाही. म्हणजे  या मातीतील नेतृत्वाने देशाचे नेतृत्व केले .तरीही त्या नेतृत्वाचा फायदा मराठवाड्याच्या…

  • मर्यादा आपच्या

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम  पक्षाने अनपेक्षितरीत्या जोरदार मुसंडी मारत आपले अस्तित्व सिद्ध केले. नेहमीप्रमाणेच याहीवेळी आप पार्टीला मिळालेल्या यशाने अनेकजण हुरळून गेले आहेत आणि इतकेच नव्हे तर राजकारणातून जवळपास निवृत्त झालेल्यांना खुर्ची दिसू लागली आहे. परंतु जे दिल्लीत घडले ते इतर ठिकाणी शक्य आहे का ? मुळात दिल्ली मध्येच ते का…

  • राजकीय इच्छाशक्तीतून मनुष्यनिर्मानाच्या व्यवस्थेकडे

    प्रत्येक देश,प्रत्येक समाज अहोरात्र एकाच गोष्टीचा घंटानाद करत असतो किंवा टाहो तर नक्कीच फोडत असतो ती म्हणजे विकास.विकास हा एकच असा मुद्दा असावा कि तो कायम चर्चेत आहे मग ते गावातली चावडी अहो किंवा देशाची संसद. देशातील सर्व तज्ञ मंडळी या एकाच उद्दिष्टाकडे मार्गक्रमण करण्याची धडपड करत आहे. मग एवढी चर्चा होऊनही आजपर्यंत आपण समाधान मानावे अश्या…

  • दुर्दशेचे बाप ब्रह्मचारी

    “ बाळाचे बाप ब्रह्मचारी “ नावाचा एक मराठी चित्रपट आहे. वास्तविक या वाक्यातील परिस्थिती शब्दश: शक्य नाही कारण बाळाचा बाप ब्रह्मचारी कसा असू शकेल ? पण देशात भ्रष्ट नेत्यांनी जे दुर्दशा नावाचे अपत्य जन्माला घातले आहे त्याचे पितृत्व नाकारत आम्ही तर ब्रह्मचारी आहोत असेच अगदी ठामपणे सांगत आहेत.आपला दिवस सुरु होतो घोटाळ्याच्या बातम्यांनी आणि संपतो तो वाढलेल्या महागाईच्या बातम्यांनी. यात थोडे समाधान असे…