राजकीय

  • सत्तावादी पक्षाची वाताहत…

    महाराष्ट्र, राजकारण आणि सत्ताकेंद्र अशा तीनही शब्दांना एकच समानार्थी शब्द म्हणजे शरद पवार. सत्ता कोणाचीही असो सत्तेचे वलय या नावापासून कधीही वेगळे झाले नाही. राज्यात अन केंद्रातही ज्यांचा शब्दाला कायम वजन होते असे नाव म्हणजे शरद पवार. वसंतदादाकडून सत्ता मिळवण्याची घाई असो किंवा तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी नावाने नवीन पक्षाची…

  • कॉंग्रेसचा नॉंन स्ट्रायकर एंड गेम

     (छायाचित्र : इंटरनेटवरून साभार ) राज्यातील निवडणूका आज संपतील. प्रचाराची रणधुमाळी पूर्णपणे थंडावली आहे. आरोप, प्रत्यारोपानी सभा गाजल्या. राजकारण हे कुस्तीसारखे असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले. म्हणजे मानसिक स्तरावर डावपेच तयार करूनच शारीरिक ताकद लावायची असते.  राज्यस्तरावर विचार करता ही कुस्ती भाजप अन कॉंग्रेस या दोन पैलवानात होती. परंतु लढताना दिसले भाजप अन राज ठाकरे….

  • लोकशाहीच्या नावानं……..

    भारतीय लोकशाही हा आता केवळ अभ्यासाचा विषय न राहता चिंतनाचा व चिंतेचा विषय होउ लागला आहे. निवडणूक ही प्रक्रिया लोकप्रतिनिधी निवडण्यापुरती मर्यादित राहिली नसून अनेकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे. निवडणूक लढवण्यासाठी आपण कार्यकर्ते असलेल्या पक्षाचे उमेदवारी मिळाली तर ठीक अन्यथा जो पक्ष संधी देईल त्या पक्षाची उमेदवारी मिळवणारांची संख्या आश्चर्यकारक आहे. निवडणूकीचे रुपांतर आर्थिक उलाढालीच्या…

  • क्या सच में न्यूज चैनलों को देखना बंद करना चाहिए ? नहीं कोई जरुरत नहीं |

    पत्रकारिता लोकतंत्र का महत्वपूर्ण अंग है | लोकतंत्र को सक्षम करने में पत्रकारिता के माध्यम से उचित विचार रखना अपेक्षित है | राष्ट्र और समाज की समस्याओं को अपनी खुद की समस्या समझकर सत्य के लिए अपनी कलम के माध्यम से लड़ना अपेक्षित है, न की खुद की समस्या को राष्ट्र की समस्या बनाकर पेश…

  • ढोंगी पुरोगामीत्वाला युद्धज्वराची व्याधी

    बालाकोटमध्ये दहशतवादी अड्ड्यावर भारताकडून झालेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर देशातील समस्त ढोंगी पुरोगामी कंपूत हडकंप निर्माण झालेला असल्याने कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सर्वांच्या हृदयातून अहिंसा,शांतता उचंबळून आली होती. सर्व वृत्तवाहीन्यातून हुसकावून लावलेले संपादक, ढोंगी पुरोगामीत्वाचे प्रदूषण करणारे चाचा तसेच अन्य क्षेत्रातील काही मंडळींना युद्धज्वराचा त्रास होत असल्याचे कळताच सर्व जन एका गुप्त ठिकाणी एकत्र झाले. सुरुवातीस…

  • भारत पुरुषार्थ विसरलेला आहे यावर ठाम विश्वास असलेला पाकिस्तान

    विविध माध्यमातून नित्य कुरापती काढणारे, चार युद्धे हरुनही खुमखुमी कायम असणारे कांगावाखोर राष्ट्र अन सर्वात महत्वाचे म्हणजे भिकेकंगाल असूनही काश्मिरात फुटीरतावादी चळवळीना प्रोत्साहन देणारे अपयशी राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानसारख्या डोकेदुखीने आतापार्यात हजारो जवानांचा बळी घेतला. स्थानिक पोलिसांवर, अर्धसैनिक बलावर सहजतेने दगडफेक करून जखमी केले जाते. अशा प्रकारचे गुन्हे करण्याची हिम्मत येते कुठून ? भारताजवळ अनलिमिटेड माणुसकी…

  • जातीयवादाचा पराभवच

    एखाद्या विषयाचे,घटनेचे विश्लेषण करत असताना तेथील परिस्थितीचे  आपल्या  पूर्वग्रहदूषित सिद्धांतानुसार  चित्रण करायचे आणि शेवटी आपल्या सोयीचा निष्कर्ष काढायचा अशी  लेखनशैली महाराष्ट्राला नवीन नाही. किंबहुना ढोंगी पुरोगामित्वाचा टेंभा मिरवयाचा असल्यास अशा प्रकारची लेखनशैली तर तलवारीचे काम करते. गुजरात निवडणूकीमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा जातीयवादाचा पराभव असल्याचे सांगितले मात्र काही लेखक आपल्या लिखाणातून…

  • मेरी मर्जी…

    देशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चर्चा ऐकल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाणे आठवले. अभिनेता गोविंदा याच्यावर चित्रित केलेल्या या गाण्याचे बोल आहेत ‘मेरी मर्जी. मै चाहे ये करू, मै चाहे वो करू, मुझे कोई रोके नही मुझे कोई टोके नही.’ म्हणजे मी वाट्टेल तसे बोलणार, वाट्टेल तसे वागणार मला कुणीही अडवू नये. माझ्या वागण्याचा काहीही दुष्परिणाम होवो मला त्याच्याशी…

  • निश्चलनीकरण आणि व्यवस्था बदल

    भारतासारख्या १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शासन यंत्रणा, कायदे मंडळ, न्यायव्यवस्था व एकूणच लोकशाही सुरळीतपणे, सक्षमपणे चालावी यासाठी असलेल्या सार्वजनिक व्यवस्थेत त्रुटी असणे हे अगदीच साहजिक आहे. विविध व्यासपीठांवरून  व विशेषत: लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमातून व्यवस्थाबदलाविषयी प्रबोधन, मागणी होणे हे ओघाने आलेच. परंतु जेव्हा शासनकर्त्यांकडून अशा काही प्रकारचे निर्णय होतात तेव्हा त्याकडे प्रसारमाध्यमे कशा…

  • अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार

    अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे . प्रत्येक नागरिक स्वत:च्या इच्छेनुसार बोलू, लिहू शकतो. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला प्रदान केलेला तो अधिकार आहे. म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याशिवाय लोकशाही ही कल्पनाच करता येत नाही. यामुळेच भारतात विविध मतप्रवाह, वेगवेगळ्या वैचारिक भूमिका यांच्यात खंडन-मंडन चालू असते. सत्ताधारी पक्षाच्या  मता विरुध्द  वैचारिक मांडणी ,भाषणे देणे, विरोध करणे, मोर्चे,…