सर्वेक्षण

  • |

    Happiness Index : आनंदाची क्रमवारी

    Happiness Index : जागतिक पातळीवर वेगवेगळ्या मुद्यांच्या अभ्यासासाठी सर्वेक्षण, पाहणी केली जाते. कधी उत्कृष्ट गुणवत्ता असलेली शैक्षणिक संस्था शोधण्यासाठी तर कधी पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. जगातील सर्वाधिक आनंदी देश शोधण्यासाठी जागतिक पातळीवर नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले. ज्यामध्ये त्या देशातील नागरिकांच्या आनंद व समाधान याबाबतीत पाहणी करून क्रमवारी तयार करण्यात आली. या यादीत भारताचा क्रमांक ११७ वा असल्याचे सांगितले गेले. अर्थात भारतासारख्या बहुरंगी, बहुढंगी व लोकजीवनात पावलापावलावर विविधता आढळणा-या या देशात आनंद व समाधान यासारख्या मानसिक पातळीवरील बाबीसंबंधात काही निवडक लोकांना प्रश्न विचारून संबंध देशाविषयी अनुमान काढणे कितपत व्यवहार्य आहे याबद्दल निश्चितपणे शंका निर्माण होऊ शकतात. खरे पाहता मुळातच या पाहणीचे प्रयोजन फारच गमतीशीर वाटते.