Teachers : शासकीय कर्मचारी नको; गुरुजी पाहिजेत
Teachers need for nation building : असे म्हणतात कि, शिक्षकाच्या एका पायात विकास तर दुसऱ्या पायात विनाश असतो. म्हणजेच एका शिक्षकाने ठरवले तर राष्ट्रनिर्माण होऊ शकते आणि शिक्षक बिघडला तर विनाश होण्यासही काही वेळ लागत नाही.सध्या तरी शिक्षक,प्राध्यापक वर्ग वेगाने आपला दुसरा पाय पुढे टाकत आहे. याचा दाखला देणारी घटना नुकतीच औरंगाबाद शहरात घडली.दोन शिक्षकात हाणामारी होऊन त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला.हि एकच घटना नाही तर महाविद्यालय परिसरात मारहाण, प्राथमिक शाळेत लैंगिक शोषण अशा अनेक घटनांनी राज्यातील शिक्षण क्षेत्र हादरवून जात आहे.