सामाजिक बदलासाठी युवामित्र
लोककल्याणाच्या हेतूने शासनस्तरावर होणारे निर्णय व योजना यांचे अमलबजावनीच्या पातळीवरील अपयश हे एकूणच सुशासनाच्या मार्गातील मोठाच अडसर आहे. स्थानिक पातळीवर अमलबजावनी प्रभावीपणे होत नाही याचे कारण लाभार्थ्यांना योजनांची,निर्णयाची तपशीलवार माहिती नसणे हे आहे. हीच परिस्थिती युवकांच्या बाबतीतही आहे. केंद्रीय युवक कल्याण मंत्रालय व राज्य शासनाच्या खात्यामार्फत युवकांसाठी विविध योजना राबवल्या जातात.युवकांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य व अन्य प्रकारचे…