Skip to content

Prasad Shivaji Joshi

  • Home
  • About
  • लेखExpand
    • राजकीय
    • सामाजिक
    • धर्म/अध्यात्म
    • शैक्षणिक
    • चिमटा
  • Videos
  • छायाचित्रे
  • विशेष लेख व बातम्या
  • प्रसारमाध्यमातील दखल
Prasad Shivaji Joshi

चिमटा

Home / चिमटा
Political Satire: एक दिन तो गुजारो गुजरात में………
चिमटा

Political Satire: एक दिन तो गुजारो गुजरात में………

मार्च 29, 2021

Political Satire : काकासाहेब राज्यातील स्थिती बाबत अगोदरच चिंतातुर होते. टीव्ही वर वृत्त बघत असतानाच एक जाहिरात आली.  अमिताभ बच्चन यांची गुजरात पर्यटन विभागाची जाहिरात चालू होती. आईए कुछ दिन तो गुजारो गुजरात में ….  अडचणीतून सुटण्यासाठी  नियतीने हा दिलेला कौल आहे असे समजून काकासाहेब थेट उठले अन गाडीत जाऊन बसले. सोबतीला प्रफुल्ल वदनाचे भाई होतेच. गाडी थेट गुजरात मधील एका रम्य परंतु अतिशय गुप्त ठिकाणी पोहोचली. काकासाहेब अन प्रफुल्ल वदनी गाडीतुन उतरून थेट एका कक्षाबाहेर पोहोचले. महाराष्ट्रातून आलेली गाडी बघितल्यावर सुरक्षारक्षकाने गुप्त कॅमेरा, पेन ड्राईव्ह नसेल ना अशी उगाचच शंका घेतली.  पण दोघांनी बनावट हास्य करून कक्षात प्रवेश केला. (घडाळ्यात दहा वाजून दहा मिनिटे झाली होती.) समोर साक्षात मोटाभाई बसले होते. त्यांनी कुत्सितपणे हास्य करत आमचे स्वागत केले. मोटाभाई :  केम छो साब काकासाहेब : अं… (विचाराच्या गुंगीतून एकदम बाहेर येत )  मस्त छो , मस्त छो । मोटाभाई : कस काय येण केलेत. (मोटाभाई एकदम मराठीत बोलू लागल्याने काका थोडं सहज झाले . ) काकासाहेब : त्याच काय आहे न….. मोटाभाई : काय म्हणतेय तुमचे सरकार (मोटाभाईने मध्येच बोलणे तोंडात अत्यंत खोचक प्रश्न विचारला.) त्यावर काकासाहेब अत्यंत वैतागलेल्या स्वरात बोलू लागले… काकासाहेब : तेच तर न. कसलं काय नी  कसल काय ?  (मोटाभाई ने अत्यंत अजाणतेपणाचा आव आणून प्रश्न केला) मोटाभाई : म्हणजे ? काकासाहेब : कोण कशाला जबाबदार आहे तेच कळेना ? मी कशा कशाला जबाबदार राहू ? गाडी कोणाची ? घर कोणाचे ? टार्गेट कोणाला ? अन ते ज्वलंत चे बोरूबहाद्दर वर मलाच अध्यक्ष व्हा म्हणतात. कितीजणाला सांभाळू मी. त्याला हजारदा बजावला गप राहा म्हणून. पण तो काय ऐकत नाही. मोटाभाई : ते गृह म्हणजे घर आणि त्याचे कारभारी तर तुमचेच ना . मग असं कस म्हणता ? (काका अत्यंत सावध झाले) प्रफुल्ल वदनातून एक गुजराती शब्द कमळ बाहेर पडले : सर, चालो फरी सुरू करिये गुजरातीतून गुगली आल्यावर मोटाभाई थोडे भावुक झाले. मोटाभाई : मुझे सोचना पडेगा ।  पिछली बार आपने ठीक नही किया । (काकासाहेब अत्यंत अवघडपणे हसून म्हणाले )  काकासाहेब : अब की बार तुम्ही च जबाबदार.  तुम्ही म्हणाल तस करू. मोटाभाई : त्यांनाही तुम्ही असंच म्हणाला नाहीत ना ?…

Political Satire : एस टी त बसा अन निरोगी रहा
चिमटा

Political Satire : एस टी त बसा अन निरोगी रहा

ऑगस्ट 21, 2020

Political Satire: एत्तदेशीय अस्सल मराठमोळे संपादक जे की फक्त कंपाऊंडरवर भरोसा ठेवतात ते आपल्या कार्यालयात WHO ला कस गंडवायच याचा विचार करत बसलेले असतानाच आम्ही त्यांना गाठले.  साहेब जै महाराष्ट्र.  साहेबांनी नाखुशीनेच बोला अस म्हटले मी: मराठी पाऊलाने जागतिक राजकारणात…

Political Satire: शकुनीचे असिस्टंट…..
चिमटा

Political Satire: शकुनीचे असिस्टंट…..

फेब्रुवारी 8, 2019

Political Satire: स्थळ : बहुधा ठाणे असेल…वेळ : अत्यंत निर्वाणीची(घडाळ्यातील काटे मंद आवाज करत असताना मध्येच हमसून हमसून कारुण्य रसातील आवाज दस्तुरखुद्दांच्या कर्णी पडला.)आता पीडितांचे दु:ख दूर करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे असे आम्ही समजतो. म्हणून जरा कानोसा घेतला…

Political Satire: ठाकरे चित्रपट अन दोन प्रेक्षकांची गुफ्तगू …..
चिमटा

Political Satire: ठाकरे चित्रपट अन दोन प्रेक्षकांची गुफ्तगू …..

जानेवारी 26, 2019

Political Satire: देशाच्या व विशेषत: राज्याच्या राजकारणात धृवपदी असलेल्या हिंदूहृदय सम्राट यांच्या जीवनावरील प्रदर्शित झाला अन दोन दिग्गज प्रेक्षकांमधला संवाद दस्तुरखुद्दांच्या कानी पडला.

Political Satire: डिजिटल आणीबाणी आणि धन्नोभौ
चिमटा

Political Satire: डिजिटल आणीबाणी आणि धन्नोभौ

जानेवारी 23, 2019

Political Satire: (धन्नोभौ आपल्या कार्यालयात येरझाऱ्या घालत असताना आणीबाणी, निषेध अस काहीतरी पुटपुटत असतात ) तेवढ्यात बुवा हातात डायरी घेऊन धा वाजून धा मिनिटाला प्रवेशते झाले. बुवा : साहेब घात झाला, घात झाला. (शांत होण्याचा निर्धार करत असतानाच जोशीबुवांच्या घातवाणी कडे…

  • Previous
  • 1
  • 2
  • 3
  • Next

© 2026 Prasad Shivaji Joshi - WordPress Theme by Kadence WP

  • Home
  • About
  • लेख
    • राजकीय
    • सामाजिक
    • धर्म/अध्यात्म
    • शैक्षणिक
    • चिमटा
  • Videos
  • छायाचित्रे
  • विशेष लेख व बातम्या
  • प्रसारमाध्यमातील दखल