अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे . प्रत्येक नागरिक स्वत:च्या इच्छेनुसार बोलू, लिहू शकतो. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला प्रदान केलेला तो अधिकार आहे. म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याशिवाय लोकशाही ही कल्पनाच करता येत नाही. यामुळेच भारतात विविध मतप्रवाह, वेगवेगळ्या वैचारिक भूमिका यांच्यात खंडन-मंडन चालू असते. सत्ताधारी पक्षाच्या मता विरुध्द वैचारिक मांडणी ,भाषणे देणे, विरोध करणे, मोर्चे,…